मुंबई पोलीस सह-आयुक्त विश्वास नांगरे पाटील सरकारचे माफिया म्हणून काम करतायेत, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
विश्वास नांगरे पाटील यांनी ठाकरे सरकारचा माफिया म्हणून काम करता येत नाही हे लक्षात घ्यावं. विश्वास नांगरे पाटलांनी मला तर बेकायदेशीर रित्या मला घरात कोंडून ठेवलं, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं.
मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांची आरोपांची मालिका सुरुच आहे. यावेळी कुणी राजकीय नेता नाही तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर त्यांनी निशाणा साधला आहे. मुंबईचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांनी लक्ष्य केलं आहेत, विश्वास नांगरे पाटील महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करत असल्याचा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
घोटाळ्यांच्या प्रकरणात राज्य सरकार तपासात अडथळे निर्माण करत आहे. त्यामुळे आम्हाला केंद्राकडे जावे लागते. हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात त्यांच्यावर मुंबई पोलीसांनी केलेल्या कारवाईबाबत बोलाताना किरीट सोमय्या यांनी म्हटलं की, मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ठाकरे सरकारचा माफिया म्हणून काम करता येत नाही हे लक्षात घ्यावं. विश्वास नांगरे पाटलांनी मला तर बेकायदेशीर रित्या मला घरात कोंडून ठेवलं. तेच सूचना देत होते, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. कोल्हापूरला जाताना ज्या पद्धतीने मला रोखले त्याविरोधात किरीट सोमय्या यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार केली आहे.
हसन मुश्रीफ यांच्या कधीही कारवाई होऊ शकते- किरीट सोमय्या
पंधराशे कोटी रुपयांचे कंत्राट हसन मुश्रीफ यांनी दादागिरी करून स्वतःच्या लोकांना दिले. कायद्याची तरतूद नसतानाही स्वतःच्या जावयाला असं कंत्राट दिलं. ग्रामपंचायतीचा खर्च कमी आणि त्यांना वर्षाला 50 हजार रुपये असे कंपनीला द्यावे लागणार आहेत, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं. भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई होणार आहे. हे सगळं काम अँटिकरप्शने करायला पाहिजे होतं, पण यांनी अँटिकरप्शनलाच करप्ट केलं आहे. राज्य सरकार तपासात अडथळे निर्माण करते म्हणून आम्हाला केंद्राकडे जावे लागते, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- किरीट सोमय्यांवरील कारवाई नक्की कोणी केली? मुख्यमंत्री कार्यालय की गृहमंत्रालय? गृहमंत्री म्हणाले...
- मला भाजपनं ऑफर दिली होती, हसन मुश्रीफांच्या खळबळजनक दाव्यावर फडणवीसांचा पलटवार; म्हणाले...
- कायद्याची लढाई कायद्यानं लढा, कोल्हापुरी चपलेनं नको; हसन मुश्रीफांना चंद्रकांत पाटलांचा टोला
- किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार : हसन मुश्रीफ