एक्स्प्लोर

अँकर अर्पिता तिवारी हत्येप्रकरणी मित्राला अटक

'अर्पिताचा मृत्यू झाला, त्यावेळी तिचा बॉयफ्रेण्ड, तीन मित्र आणि घरकाम करणारी व्यक्ती उपस्थित होते. मग फक्त अमित हजराला का अटक केली. या हत्येत इतरांचा सहभाग नाकारता येत नाही' असा संशय अर्पिताच्या मोठ्या बहिणीने व्यक्त केला आहे.

मुंबई : 24 वर्षीय अँकर अर्पिता तिवारीच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी तिच्या मित्राला अटक केली आहे. 28 वर्षीय अमित हजरा याला सोमवारी बेड्या ठोकण्यात आल्या. 11 डिसेंबर 2017 रोजी मालाडमधील उच्चभ्रू वसाहतीत अर्पिताचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत आढळला होता. परिस्थितीजन्य आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी ही अटक केली आहे. कलिन्यातील फॉरेन्सिक लॅबमध्ये चारही संशयितांची पॉलिग्राफ टेस्ट केल्यानंतर अमितची उत्तरं असमाधानकारक आढळली. त्यामुळे त्याला बेड्या ठोकल्याचं पोलिसांनी सांगितलं. अमित हजरा मूळ झारखंडमधील धनबादचा असून मुंबईत एका अॅडव्हर्टायझिंग आणि फिल्म प्रॉडक्शन कंपनीत काम करतो. त्याला बोरीवली कोर्टात हजर केल्यानंतर 24 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबईत अँकर तरुणीची इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या

अर्पिताच्या कुटुंबीयांनी तिच्या बॉयफ्रेण्डसह पाचही मित्रांवर आरोप केला होता. मालाडच्या मानवस्थळ इमारतीतील दुसऱ्या मजल्याच्या बांधावर अर्पिताचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत सापडला होता. अर्पिताला 15 व्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीतून खाली ढकलल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला होता. 'अर्पिताचा मृत्यू झाला, त्यावेळी तिचा बॉयफ्रेण्ड, तीन मित्र आणि घरकाम करणारी व्यक्ती उपस्थित होते. मग फक्त अमित हजराला का अटक केली. या हत्येत इतरांचा सहभाग नाकारता येत नाही' असा संशय अर्पिताच्या मोठ्या बहिणीने व्यक्त केला आहे.

अँकर तरुणीचा मृत्यू : अर्पिता तिवारीला पंधराव्या मजल्यावरुन ढकललं?

10 डिसेंबर म्हणजे अर्पिताच्या मृत्यूच्या आदल्या रात्री सर्व मित्र दोन रेस्ट्रोबारमध्ये गेले होते. त्यांनी एकत्र काही ड्रिंक्स घेतली. अर्पिता आणि तिचे मित्र मालाडमधील अपार्टमेंटमध्ये आले. तिथे त्यांचे कॉमन मित्र भाड्याच्या घरात राहत होते. दुसऱ्या दिवशी अर्पिताचा मृतदेह दुसऱ्या मजल्यावर इमारतीच्या बाहेरच्या भागात अर्धनग्नावस्थेत लटकलेला होता. फॉरेन्सिक अहवालानुसार मृत्यूच्या वेळी तिने मद्यप्राशन केलं होतं. सुरुवातीला मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र तिच्या वडिलांनी संशय व्यक्त केल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. अज्ञातांविरोधात कलम 302 (हत्या) आणि कलम 201 (पुरावे नष्ट करणे) गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांचा दावा पोलिसांच्या माहितीनुसार अर्पिताचे तिच्या बॉयफ्रेण्डसोबत वाद सुरु होते. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि क्राईम सीन रिक्रिएट केला. पोलिसांनी आत्महत्या, चुकून कोसळणं आणि जाणीवपूर्व धक्का देऊन खाली पाडणं या सर्व शक्यतांवर विचार केला. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला होता, त्यामुळे संशयाला जागा आहे, असं तपास पथकाच्या अधिकाऱ्याने सांगितलं. मृत्यू झाला त्या दिवशी अँकरने मद्यपान केलं असलं तरी ती कपड्यांशिवाय उडी मारणार नाही. यासोबतच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या चार जणांचे जबाबही परस्परविरोधी आहेत, असंही अधिकाऱ्याने सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Embed widget