शॉपिंग मॉलमधील गेम झोनमध्ये जम्पिंग गेम गेम खेळणाऱ्यांनो सावधान! मुंबईतील एका मॉलमधील गेम झोनमध्ये खेळताना एका तरुणाचा पाय मोडला
Mumbai News: बाउन्स गेमसाठी उडी मारली तेव्हा बाऊन्स ट्रॅम्पोलिनचा स्प्रिंग तुटला आणि तरुण पडला. खेळताना पडल्यामुळे त्याचा गुडघा फ्रॅक्चर झाला आहे.
![शॉपिंग मॉलमधील गेम झोनमध्ये जम्पिंग गेम गेम खेळणाऱ्यांनो सावधान! मुंबईतील एका मॉलमधील गेम झोनमध्ये खेळताना एका तरुणाचा पाय मोडला Mumbai News youth broke his leg while playing in a game zone in a mall in Mumbai शॉपिंग मॉलमधील गेम झोनमध्ये जम्पिंग गेम गेम खेळणाऱ्यांनो सावधान! मुंबईतील एका मॉलमधील गेम झोनमध्ये खेळताना एका तरुणाचा पाय मोडला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/2429152e46c9bef54d0fb6cbc3ac56ab168758012820289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईतील (Mumbai News) शॉपिंग मॉलमधील गेम झोनमध्ये (Mumbai Shopping Mall Accident Incident) जम्पिंग गेम खेळणाऱ्यांनो सावधान...मालाडच्या इन्फिनिटी मॉलच्या गेम झोनमध्ये बाऊन्स जम्पिंग गेम खेळताना एका तरुण मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. बाउन्स गेमसाठी उडी मारली तेव्हा बाऊन्स ट्रॅम्पोलिनचा (Trampoline park) स्प्रिंग तुटला आणि तरुण पडला. खेळताना पडल्यामुळे त्याचा गुडघा फ्रॅक्चर झाला आहे. तीर्थ कांजी बेरा असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
18 जून रोजी तीर्थ कांजी बेरा नावाचा विद्यार्थी आपल्या मित्रांसह मालाड पश्चिम येथील इन्फिनिटी मॉलमध्ये गेम झोनमध्ये खेळण्यासाठी गेला होता. गेम झोनमध्ये जाण्यापूर्वी त्याने तिकीट काढले आणि बाउन्स गेमसाठी उडी मारली तेव्हा बाऊन्स ट्रॅम्पोलिनचा स्प्रिंग तुटला आणि तो तरुण पडला. त्यानंतर या तरुणाच्या उजव्या पायात तीव्र वेदना होऊ लागल्याने त्या तरुणाला कुर्ल्यातील क्रिटिकेअर एशिया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली असलेल्या हाडात फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले.
कुर्ल्यातील (Kurla) रुग्णालयात उपचार सुरू
तीर्थ कांजी बेरा हा 19 वर्षाचा आहे आणि तो विद्यार्थी असून घाटकोपर येथे राहतो. सध्या तीर्थला उपचारासाठी कुर्ल्यातील क्रिटी केअर एशिया, मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ज्या वेळी तीर्थसोबत हा अपघात झाला, त्यावेळचा एक व्हिडीओही समोर आला. या व्हिडीओमध्ये तीर्थ उडी मारत असताना उडी मारण्याच्या खेळाचा स्प्रिंग तुटली आणि तो पडतो. त्यानंतर या तरुणाच्या उजव्या पायात तीव्र वेदना होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली असलेल्या हाडात फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले.
गेम झोनच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल
हा प्रकार समोर आल्यानंतर बांगूर नगर पोलिसांनी गेम झोनच्या (Game Zone) व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.बांगूर नगर पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम 336, 338 अन्वये निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हे ही वाचा :
Thackeray Group Office : वांद्रे पूर्वमधील ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर बीएमसीची कारवाई, बांधकाम पाडलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)