Mumbai News: रीलसाठी लोकलमध्ये स्टंट केला...व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिस ताब्यात घ्यायला घरी पोहोचले अन्, दृश्य पाहून त्यांनाही बसला मोठा धक्का
Mumbai News: आजच्या सोशल मिडीयाच्या जागात फेमस होण्यासाठी अनेक जण आपल्या जीवाची बाजी लावतात. सोशल मिडीयावर आपल्या रीलला फोटोला लाईक आणि कमेंट मिळवण्यासाठी ते आपल्या जीवाची पर्वा न करता अतरंगी प्रयोग करतात.
Mumbai News: आजच्या सोशल मिडीयाच्या जागात फेमस होण्यासाठी अनेक जण आपल्या जीवाची बाजी लावतात. सोशल मिडीयावर (Social Media) आपल्या रीलला फोटोला लाईक आणि कमेंट मिळवण्यासाठी ते आपल्या जीवाची पर्वा न करता अतरंगी प्रयोग करतात. कधी कधी आपण करत असलेली स्टंट आपल्या जीवावर बेतू शकतो किंवा आपला जीव घेऊ शकतो यांचा अंदाज तरूणाईला नसल्याचं चित्र वारंवार आपल्याला दिसून येतं. अशातच मुंबईला एका तरूणाने रील बनवण्याच्या नादात आपला एक हात आणि एक पाय गमावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी धावत्या लोकलमध्ये दरवाजाला पकडून स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. त्यानंतर स्टंट करणाऱ्या तरुणाविरोधात आरपीएफ पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्या तरूणाचा शोध सुरू केला होता. मात्र स्टंट करणाऱ्या तरुणापर्यंत रेल्वे पोलिस पोहोचेपर्यंत (आरपीएफ) तरुणाने आपलाएक हात आणि एक पाय गमावल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
लोकलच्या दाराशी स्टंट करणाऱ्या या तरुणाचे नाव फरहत आझम शेख असं आहे. 14 एप्रिलला फरहतला मशीद बंदर स्थानकावर स्टंट करताना अपघात झाल्याची माहिती उघड झाली आहे. या भीषण अपघातात (Accident) त्याने आपला हात आणि पाय गमावला आहे.
व्हायरल व्हिडीओवरून तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा रेल्वे पोलिसांनी शोध सुरू केला होता. मात्र, पोलिस जेव्हा स्टंट करणाऱ्या फरहतच्या घरी पोहोचले तेव्हा फरहत आझम शेखला पाहून त्यांना धक्का बसला. स्टंट करताना फरहतने हात आणि पाय गमावला होता. रेल्वे पोलिसांनी व्हायरल व्हिडीओमधील घटनेची चौकशी केल्यावर हा व्हायरल व्हिडीओ 7 मार्चला केला असल्याची माहिती उघड झाली आहे. सोशल मीडियावर जास्त लाईक्स मिळविण्यासाठी शिवडी स्थानकांवर सीएसएमटीकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये स्टंट करण्याची कबुली फरहत याने आरपीएफ पोलिसांना दिली आहे.
स्टंट बेतला जीवावर
14 एप्रिलला फरहतला मशीद बंदर स्थानकावर दुसरा स्टंट करताना जीवघेणा अपघात झाला आणि त्यामध्ये त्याला डावा हात आणि पाय गमवावा लागला. रेल्वे प्रशासनाने त्यांना सीएसएमटी येथील सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याने एका व्हिडीओद्वारे सर्व प्रवाशांना धोकादायक कृत्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
#Mumbai
— मुंबई Matters™ (@mumbaimatterz) July 14, 2024
Attn : @RailMinIndia @drmmumbaicr @grpmumbai @RPFCR @Central_Railway @cpgrpmumbai
Such Idiots performing Stunts on speeding #MumbaiLocal trains are a Nuisance just like the Dancers inside the trains.
Should be behind Bars.
Loc: Sewri Station.#Stuntmen pic.twitter.com/ZWcC71J44z
स्टंटचा व्हिडिओ व्हायरल
अधिकाऱ्याने सांगितले, “जेव्हा आरपीएफने त्या मुलाचा शोध घेतला, तेव्हा 14 एप्रिल रोजी मस्जिद स्टेशनवर स्टंट करताना फरहत आझम शेख या मुलाचा पाय आणि एक हात गमावल्याचे पाहून अधिकाऱ्यांना धक्का बसला. व्हायरल झालेला व्हिडिओ या वर्षी 14 मार्चचा असल्याचे त्यांनी सांगितले. शिवडी स्थानकावरील त्याच्या एका मित्राने त्याचे रेकॉर्डिंग केले आणि नंतर सोशल मीडियावर अपलोड केले. मुंबई लोकलमध्ये अनेकदा धोकादायक स्टंटचे व्हिडिओ व्हायरल होतात. रील बनवण्यासाठी लोक जीव धोक्यात घालत आहेत. काही दिवसांपूर्वी रील बनवताना खड्ड्यात पडून एका मुलीचा मृत्यू झाला होता.