मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावर अजित पवार हेच आधार, मुस्लिम संघटना चर्चा करणार; पोलिस महासंचालक, मुंबईचे कमिशनरही उपस्थित राहणार
Mosque Loudspeaker Mumbai : ज्या मशिदीत कोर्टाने आखून दिलेल्या नियमांची पालमल्ली होत असेल तर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. पण पोलिस चुकीच्या पद्धतीने कारवाई करत असल्याची तक्रार संघटनांची आहे.

मुंबई : नियम पाळले तरीही मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दबावामुळे पोलिस जबरदस्तीने कारवाई करत आहेत. यातून आता उपमुख्यमंत्री म्हणून मार्ग काढावा अशी मागणी करत मुंबईतील मुस्लिम संघटना अजित पवारांची भेट घेणार आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी मुस्लिम संघटनांच्या शिष्टमंडळाची एक बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडणार आहे. या शिष्टमंडळात आमदार नवाब मलिक, अबू आझमी, वारिस पठाण, जल्लाल उद्दीन, भायखळाचे आमदार मनोज जामसुतकर उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती हेदेखील उपस्थित असणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून मशिदीवरील भोंग्यांवरुन त्रास दिला जात असल्याची तक्रार मुस्लिम संघटनांची आहे. पोलिस जबरदस्तीने मशिदीवरून लाऊड स्पीकर उतरवत आहेत. उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत की 45 ते 56 डेसिबल आवाज भोंग्यासाठी चालेल. असं असतानाही पोलिस कोणतीही तपासणी न करता भोंगे उतरवत असल्याची तक्रार मुस्लिम संघटनांची आहे.
Masjid Loudspeaker Mumbai : पोलिस जबरदस्तीने कारवाई करतात
ज्या मशिदीत नियमांची पायमल्ली होत असेल तिथे दंड करण्याची, नोटीस देण्याची किंवा लायसन रद्द करण्याची कारवाई अपेक्षित आहे. कोर्टाने भोंगे उतरवा असं कुठेही म्हटलेलं नाही. परंतु तरीदेखील पोलिस जबरदस्तीने भोंगे उतरवत आहेत असं संघटनांच म्हणणं आहे.
Loudspeakers In Mosques : किरीट सोमया यांच्या दबावामुळे पोलिस कारवाई?
भोंगे उतरवण्याची मोहीम सध्या माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सुरू केली आहे. किरीट सोमया गोवंडी किंवा आजूबाजूच्या मुस्लिम परिसरात जाऊन स्थानिक पोलिसांवर दबाव आणत आहेत. के जबरदस्तीने भोंगे उतरवण्यास पोलिसांना भाग पाडत आहेत असंही मुस्लिम संघटनांच म्हणणं आहे.
अजित पवार यांच्याशीच चर्चा का?
महायुती सरकारमध्ये मुस्लिम समाजासाठी आश्वासक चेहरा म्हणजे अजित पवार अशी धारणा मुस्लिम संघटनांची आहे. महायुती सरकारमध्ये असूनही अजित पवार यांनी मुस्लिम समाजाला अंतर दिलं नाही. विशाळगड येथील मुस्लिमांची घरं पाडणे असेल, सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील एका मुस्लिम तरुणाच्या हत्येचा मुद्दा असेल किंवा मीरा रोडच्या दंगल असो, अजित पवारांनी मुस्लिम समाजाच्या बाजूने घेतलेली भूमिका ही धर्मनिरपेक्ष विचारधारेची होती. त्यामुळेच आता भोंग्याच्या मुद्द्यावर अजित पवार न्याय देतील असा विश्वास मुस्लिम संघटनांना आहे. सरकारमधील मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांच्याकडून आपणास अपेक्षा नाही असं मुस्लिम संघटनांनच म्हणणं आहे.
ही बातमी वाचा:
























