एक्स्प्लोर

Mumbai Milk : नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ, मुंबईत नागरिकांच्या जीवाशी खेळ; तीन जणांना अटक

Mumbai Milk News : मुंबईमध्येही (Mumbai) दुधात भेसळ होत असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचं समोर आलं आहे.

Mumbai Milk News : तुम्ही खरेदी करत असलेल्या दुधात भेसळ (Adulteration in milk)  तर नाही ना? हे तपासून बघा म्हणण्याची वेळ आता आली आहे. कारण अनेक ठिकाणी दुधामध्ये भेसळ केली जात असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. मुंबईमध्येही (Mumbai) दुधात भेसळ होत असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचं समोर आलं आहे. मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्‍या पोयसर परिसरात गुन्हे शाखेने छापेमारी करुन 235 लीटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

235 लीटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त, साहित्यही जप्त

मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्‍या पोयसर परिसरात दुधात भेसळ करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. 235 लीटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्यही यूनीट 12 व अन्न व सुरक्षा विभागाने छापा जप्त केले आहे. विरय्या मल्लया चिराबोयना (46 वर्षे), रवी तेलू बिसखामय (30 वर्षे) आणि शंकर पेतय्या मंदरा (42 वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. या तीन जणांविरोधात अन्न व औषध भेसळ विरोधी कायदा तसेच फसवणूक इत्यादी कलमांतर्गत समता नगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे तिघेही दूध विक्री करताना नफा मिळवण्याच्या हेतूने दुधात भेसळ करुन नागरिकांची जीवाशी खेळ सुरु आहे. 

अनेक वर्षांपासून नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ होत असल्याचे समोर  

कांदिवली बोईसर या परिसरात दुधात भेसळ करणारी टोळी कार्यरत आहे. ही टोळी मागील काही वर्षांपासून नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करुन मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दुधाची विक्री करुन नागरिकांच्या जीवाशी खेळत होती, याबाबतची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने अन्न व औषध प्रशासनासोबत शनिवारी पहाटे कांदिवली पूर्वेकडील पोयसर भागातील काजुपाडा गावदेवी परिसरातील तीन घरांवर छापा टाकला. छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोकुळ, अमूल या सारख्या नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या भरलेल्या आणि अर्धवट भरलेल्या पिशव्या आणि Adulterated milk भेसळीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. त्यानंतर गुन्हे शाखेसह अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

अमूल, गोकूळच्या दुधात भेसळ; मुंबईतील टोळीचा पर्दाफाश, एक हजार लिटर दुध जप्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Union Budget 2025: आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
Budget 2025 Income Tax Slab: मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 01 February 2025Top 100 News : टॉप शंभर बातम्यांचा आढावा : 01 February 2025 : ABP MajhaZero Hour | Namdev Shastri On Dhananjay Munde | नामदेवशास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण,विरोधकांचे सवालZero Hour Full |Namdev Shastri यांच्याकडून पाठराखण, Anjali Damania भगवानगडावर जाणार; पुढे काय घडणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Union Budget 2025: आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
आयकरपासून, पेन्शन, वंदे भारत, शेतकऱ्यांपर्यंत; आज केंद्रीय अर्थसंकल्पात होणार मोठ्या घोषणा
Budget 2025 Income Tax Slab: मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
मध्यमवर्गीयांना खुशखबर मिळणार, टॅक्स स्लॅबमध्ये महत्त्वपूर्ण बदलांची शक्यता, 10 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त?
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Embed widget