एक्स्प्लोर
मेट्रो-3च्या दिवसरात्र कामासाठी अखेर हायकोर्टाचा हिरवा कंदील
ध्वनीप्रदुषणाचा रहिवाश्यांना त्रास झाल्यास ते इमेलद्वारे मेट्रोच्या ध्वनीप्रदुषणाबाबत तक्रारी करू शकतात अशी माहीती राज्य सरकारनं दिलीय.
मुंबई : मेट्रो-3 संदर्भात राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. दक्षिण मुंबईत मेट्रो 3 साठी दिवसरात्र काम सुरू करण्यास हायकोर्टानं हिरवा कंदील दिलाय. यासंदर्भात रॉबिन जयसिंघानी यांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टानं निकाली काढलीय. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे ध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावर रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मेट्रोच्या कामावरील बंदी दूर होणाराय.
मुंबईच्या रस्त्यांवरील 24 तास धावणा-या वाहनांचे आवाज, मशिदींवरील भोंगे, विविध विकासकामातून निर्माण होणारे ध्वनीप्रदुषण यामुळे मुंबई आधीच कान बंद करून बसलीय. त्यामुळे मेट्रोच्या कामातून होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाचा उगाच कशाला बाऊ का केला जातोय? मुंबईतील आवाजाची पातळी आधिच जास्त असून मेट्रोच्या कामाचा या आवाजाच्या पातळीवर काही फरक पडणार नाही असा दावा राज्य सरकारच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आला होता.
'निरी' या संस्थेने केलेल्या तपासणीत शहरात सरासरी 80 डेसीबल इतका आवाज होत असून मेट्रोच्या बांधकामाचा आवाज यापेक्षा कमी आहे. असा दावा सरकारने हायकोर्टात केला होता. ध्वनीप्रदुषणाचा रहिवाश्यांना त्रास झाल्यास ते इमेलद्वारे मेट्रोच्या ध्वनीप्रदुषणाबाबत तक्रारी करू शकतात अशी माहीती राज्य सरकारनं दिलीय.
निरीच्या अहवालात दिलेल्या निर्देशांनुसार साऊंड बॅरीयर्सचा वापर करावा. शक्य तो खोदकामाची अवजड साधनं दिवसाच्यावेळी वापरावी जेणेकरून रात्रीच्यावेळी रहिवाश्यांना आवाजाचा जास्त त्रास होणार नाही. या गोष्टींचीही काळजी घेतली जाईल, अशी हमी राज्य सरकारनं दिलीय.
ध्वनीप्रदुषणाच्या मुद्यावरून हायकोर्टाने डिसेंबर 2017 पासून मेट्रो 3 साठीच्या रात्रपाळीच्या कामावर बंदी घातली होती. याचा फटका मेट्रो प्रशासनाला बसला असून त्यामुळे कामाची डेडलाईन हुकण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी दक्षिण मुंबईत मेट्रो 3 चे काम 24 तास सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी अशी याचिका मुंबई मेट्रो प्रशासनाने हायकोर्टाकडे केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement