एक्स्प्लोर
मोर्चेकरांचा परतीचा प्रवास सुखरुप व्हावा, ही सदिच्छा: शरद पवार
‘एक मराठा, लाख मराठा’ म्हणत आज राज्यभरातून आलेल्या मराठा समाजानं मुंबईत क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला.
मुंबई: ‘एक मराठा, लाख मराठा’ म्हणत आज राज्यभरातून आलेल्या मराठा समाजानं मुंबईत क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला.
आज सकाळी 11 वाजता भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यानापासून सुरु झालेला मोर्चा दोन तासात शिस्तबद्धपणे आझाद मैदानात दाखल झाला. आझाद मैदानात पोहोचल्यानंतर या मोर्चातल्या तरुणींनी आपल्या मनातला आक्रोश उपस्थित जनसागरासमोर मांडला.
शरद पवार यांची प्रतिक्रिया
दरम्यान, आजच्या मोर्चाबाबत शरद पवार यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
पवार म्हणाले, “आज मुंबईमध्ये मराठा मोर्चा हा अत्यंत शांततेने होत आहे आणि आपली भूमिका मोर्चेकरी शासनाकडे मांडतील याचा मला विश्वास आहे.
राजर्षि शाहू महाराजांची मराठा समाजहिताची संकल्पना व अन्य अठरापगड जाती-जमातीच्या प्रश्नालाही सकल मराठा विचारांची साथ राहील.
या सर्वसमावेशक प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नव्या पिढीच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी योग्य पाउले टाकली जातील, अशी माझी सरकारकडून अपेक्षा आहे.
मोर्चेकऱ्यांच्या या सर्व प्रयत्नांना माझ्या मनापासून शुभेच्छा! त्याचप्रमाणे मोर्चेकऱ्यांचा परतीचा प्रवास सुखरूप व्हावा, ही सदिच्छा!”
https://twitter.com/PawarSpeaks/status/895199801201053696
https://twitter.com/PawarSpeaks/status/895201220369027074
https://twitter.com/PawarSpeaks/status/895202514043367425
https://twitter.com/PawarSpeaks/status/895203049853116416
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement