एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

चुकीचं नाव बदलण्यासाठी लढा, निर्दोष असूनही मिळत नाहीय नोकरी, चुकीच्या कारकुनीची मोजावी लागतेय किंमत

Fight to Get Name Right : मुंबईतील एका व्यक्तीला त्याच्या नावातील टायपिंगच्या चुकीमुळे त्रास सहन करावा लागला. इतकंच नाही तर या व्यक्तीला निर्दोष असूनही नोकरी मिळण्यात अडथळे येत आहेत.

Fight to Get Name Right : एकाच्या चुकीची शिक्षा दुसऱ्याला असं चित्र आपण अनेक वेळा चित्रपटांमध्ये पाहतो. मात्र असंच काहीस खऱ्या आयुष्यातही घडलं आहे. एका व्यक्तीच्या छोट्याश्या चुकीची दुसऱ्याला शिक्षा मिळाली असं म्हणावं लागेल. मुंबईतील एका व्यक्तीसोबत असंच काहीसं झालं आहे. या व्यक्तीला याने केलेल्या चुकीमुळे नाही तर न केलेल्या चुकीमुळे नाहक त्रास झाला. मुंबईतील एका व्यक्तीला त्याच्या नावातील टायपिंगच्या चुकीमुळे त्रास सहन करावा लागला. इतकंच नाही तर या व्यक्तीला निर्दोष असूनही नोकरी मिळण्यात अडथळे येत आहेत.

काय आहे प्रकरण?

फैजान नावाच्या 28 वर्षीय व्यक्तीची 2014 साली लागलेल्या निकालात एका प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र, पोलिसांच्या टायपिंग मिस्टेकमुळे आरोपपत्रामध्ये त्याच्या नावाचं स्पेलिंग चुकलं होत. या व्यक्तीचं नाव फैजान (Faizan) ऐवजी फौजान (Fauzan) टाईप झालं होतं. या इसमाची प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली मात्र. या कागदपत्रांवरही त्याचं नाव फैजान ऐवजी फौजान झालं आहे. परिणामी आरोपातून निर्दोष मुक्तता होऊनही फैजानला नोकरी मिळण्यात अडथळे येत आहेत. 

निर्णयावर पुनर्विचार करण्याचे सत्र न्यायालयाचे निर्देश

न्यायालयाच्या चुकीसाठी कोणालाही त्रास होऊ नये, असे निरीक्षण नोंदवत सत्र न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. दंडाधिकारी न्यायालयाने 2014 च्या निकालात आरोपपत्रातील नावात झालेली चूक सुधारण्याची मागणी करणारी 28 वर्षीय व्यक्तीची याचिका फेटाळण्यात आली आहे. 

या व्यक्तीचं नाव फैजान आहे, तर कारकुनी करताना त्याच्या नावाचं स्पेलिंग 'फौजान' असे चुकीचे गेलं. फैझान शेख यानं म्हटलं की चुकीच्या कारकुनीची किंमत त्याला महागात पडली यामुळे तो बेरोजगार झाला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने याचिकेत बदल करण्यात सात वर्षांचा विलंब झाल्याचं कारण देत फेब्रुवारीमध्ये फैजानची दुरुस्तीची याचिका फेटाळली होती. एफआयआरमध्ये 'फौजान' नाव असल्याचं कारण देत दंडाधिकारी न्यायालयाने याचिका फेटाळली होती. 

काय म्हणालं सत्र न्यायालय?

'अर्जदाराच्या मूळ नावातील टायपिंगमध्ये झालेल्या चुकीमुळे त्याला त्रास झाला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला या प्रकरणातून निर्दोष सोडण्यात आले असले तरी नोकरी मिळण्यात अडचण येत आहे. न्यायालयाच्या चुकीचा त्रास कोणालाही होऊ नये.' असे सत्र न्यायालयाने सांगितलं.

'पोलिसांनी नावातील चूक केली मान्य'

फैजान शेख याने जानेवारीत दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. नावातील चूक सुधारण्याची फैजानची याचिका 24 फेब्रुवारी रोजी दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर फैजान यानं सत्र न्यायालयात धाव घेतली. त्याच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं की, दंडाधिकार्‍यांनी 08 फेब्रुवारी रोजी पत्राद्वारे पोलीस ठाण्यात नाव नोंदवण्यात चूक झाल्याचं मान्य केलं नाही. आरोपपत्रात फैजान शेख ऐवजी 'फौझान शेख' असे चुकीचं नमूद करण्यात आले आहे. दरम्यान नाव दुरुस्त करण्यासाठी पोलिसांनी एनओसीही दिली आहे.' आता फैजानला कधी दिलासा मिळतो, हे पाहावं लागेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :1 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 1  December 2024Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  1 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
नाकात नथ अन् पिवळी साडी; मंगलस्नान विधीत हळदीनं माखलेला शोभिता धुलिपालाचा लूक व्हायरल
नाकात नथ अन् पिवळी साडी; मंगलस्नान विधीत हळदीनं माखलेला शोभिता धुलिपालाचा लूक व्हायरल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
Embed widget