आधी सोबत दारु प्यायले, नंतर प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न; प्रियकर गजाआड, मुंबईतील खळबळजनक घटना
Mumbai Latest Crime News: श्रद्धा वालकर हत्याकांडानं देश हादरला आहे, हे प्रकरण ताजं असतानाच मुंबईतील आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
Mumbai Latest Crime News: श्रद्धा वालकर हत्याकांडानं देश हादरला आहे, हे प्रकरण ताजं असतानाच मुंबईतील आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. दहिसरमध्ये प्रियकरानं प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रियकराच्या हल्ल्यामध्ये प्रेयसी गंभीर जखमी झाली असून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. दहिसर पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. 13 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. मारहाणीत त्या तरुणीच्या डोक्याला आणि मणक्याला फ्रॅक्चर झाले असून कमरेच्या खाली देखील तिला खूप मार लागला असल्याने तिला अर्धांग वायू झाला आहे.
तरुणीला दारु पाजून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगावमधील दिंडोशी परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय प्रियांगी बोरीवलीमध्ये महिंद्रा टेक कंपनीमध्ये कामाला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियांगी 25 वर्षीय अमेय दरेकर याच्यासोबत प्रेमात होती. दोघांमध्ये प्रेम इतकं वाढलं होतं की, प्रियांगी घरी न जाता आठवड्यातील दोन ते तीन दिवस अमयसोबत राहत होती. 13 नोव्हेंबर रोजी प्रियांगी कामावरुन सुटल्यानंतर आरोपी प्रियकर अमयसोबत अभिनव नगर येथे राहणाऱ्या मित्राच्या घरी गेले. मित्रांनी त्यांना पार्टी करण्यासाठी बोलवलं होतं. मित्राच्या टेरिसवर प्रियांगी, अमेय आणि त्या मित्रांनी दारु प्यायली. रात्री नऊ वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत दारु पीत होते. दारु संपल्यानंतर मित्रा झोपण्यासाटी प्लॅटमध्ये गेला. प्रियांगी आणि अमेय टेरिसवरील पाण्याच्या टीकावर बसले होते. थोड्यावेळानंतर अचानक प्रियांगी टाकीवरुन खाली पडली. तिला गंभीर दुखापत झाली.
पोलिसांनी सांगितलं की, प्रियांगीला दुखापत झाल्यानंतर आरोपी अमयने तिला घरी नेहलं. त्याच्या आई वडिलांनीही तिला रुग्णालयात नेहलं नाही. उलट सकाळी सात वाजता दुखापतग्रस्त प्रियांगीला दिंडोशी येथे घरी सोडून निघून गेले. मॉर्निंग वॉक करुन आल्यानंतर प्रियांगीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून तिच्या आई-वडिलांना धक्का बसला. प्रियांगी बेशुद्ध अवस्थेत होती. आई-वडिलांनी प्रियांगाली तात्काळ रुग्णालयात दाखल केले. अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात प्रियांगीवर उपचार सुरु आहेत. दहिसर पोलिसांनी आरोपी प्रियकर अमेयला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रियांगीच्या कुटुंबियांनी अमेयवर गंभीर आरोप केला आहे. प्रियांगीला अमेयनं जाणूनबुजून गगनचुंबी इमारतीवर दारु पिण्यासाठी नेहलं. तिला बळजबरी दारु पाजली. प्रियांगी नशेत असताना धक्का मारला. दिल्लीमध्ये श्रद्धाबरोबर जे झालं ते प्रियांगीबरोबर करण्याचा अमेयचा कट होता, असा आरोप प्रियांगीच्या कुटुंबियांनी केला आहे.