एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
घाटकोपरमध्ये पाईपलाईन फुटली, वाहनं वाहून गेली
मुंबई : मुंबईच्या घाटकोपरमधील असल्फा परिसरात पाईपलाईन फुटल्यामुळे अक्षरशः नदीच्या प्रवाहाप्रमाणं लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे. घाटकोपरमध्ये बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
फुटलेल्या पाईपलाईनचा व्हॉल्व जोडण्यात आता यश आलं असलं तरी ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे.
पाईपलाईन फुटली तेव्हा जोरात आवाज झाला. पाण्याचा प्रवाह एवढा जबरदस्त होता की 40 ते 50 फुट उंच पाण्याचे फवारे उडत होते. त्यामुळे परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. लोकांच्या घरातही पाणी शिरलं होतं. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. अनेकांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत.
काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी घटनास्थळाला भेट देऊन याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र ही पाईपलाईन फुटल्याने पुढील तीन ते चार दिवस या परिसरातील नागरिकांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
शेत-शिवार
मुंबई
Advertisement