एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

म्हाडाच्या 819 घरांसाठी लॉटरी, कोणत्या गटासाठी किती घरं?

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई विभागातील विविध वसाहतीतील 819 घरांसाठी ही लॉटरी असेल.

मुंबई: मुंबईतील 819 घरांसाठी म्हाडाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या घरांसाठी 16 सप्टेंबरपासून अर्ज करता येतील, तर 10 नोव्हेंबरला लॉटरी जाहीर होईल. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई विभागातील विविध वसाहतीतील 819 घरांसाठी ही लॉटरी असेल. 10 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात संगणकीय सोडत काढण्यात येईल. सदर सोडतीकरिता जाहिरात शुक्रवार, दि. 15 सप्टेंबर 2017 रोजी विविध वर्तमानपत्रांमध्ये आणि म्हाडाच्या https://mhada.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. सदर सोडतीकरिता माहितीपुस्तिका आणि ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच संकेतस्थळावर अर्जदाराची नोंदणी दि. १६/०९/२०१७ रोजी दुपारी २ वाजेपासून दि. २१/१०/२०१७ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत केली जाणार आहे. नोंदणीकृत अर्जदारास नोंदीत माहितीमध्ये दिनांक १६/०९/२०१७ रोजी दुपारी २ ते दि. २२/१०/२०१७ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत बदल करता येणार आहे. म्हाडा लॉटरी: पगार दीड लाख, तरीही आमदारांना अल्प गटात राखीव घरं नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास दि. १७/०९/२०१७ रोजी दुपारी २ ते दि. २२/१०/२०१७ रोजी रात्री १२ वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. बँकेत डीडी स्वीकृती दि. १७/०९/२०१७ ते दि. २५/१०/२०१७ या कालावधीत केली जाणार आहे. यंदा प्रथमच अर्जदारांना NEFT / RTGS द्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. NEFT / RTGS द्वारे चलन निर्मिती दि. १७/०९/२०१७ दुपारी २ ते दि. २३/१०/२०१७ रोजी रात्री १२ पर्यंत करता येणार आहे. NEFT / RTGS द्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी दि. १७/०९/२०१७ दुपारी २ ते दि. २४/१०/२०१७ रोजी रात्री १२ पर्यंत कालावधी असणार आहे. डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड , इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम दि. १७/०९/२०१७ रोजी दुपारी २ ते दि. २४/१०/२०१७ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहे. यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटाकरिताच्या सदनिकांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटाकरिता दि. ०१/०४/२०१६ ते ३१/०३/२०१७ या कालावधीमध्ये असलेले अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न (पती + पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) रु. २५,०००/ पर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटाकरिता रु. २५,००१ ते रु. ५०,००० पर्यंत व मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. ५०,००१ ते रु. ७५,००० पर्यंत तर उच्च उत्पन्न गटाकरिता अर्जदाराचे रु. ७५,००१ वा त्यापेक्षा जास्त सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. कोणत्या गटासाठी किती अनामत रक्कम ऑनलाईन अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क (विना परतावा) अत्यल्प उत्पन्न गटाकरिता रु. १५,३३६/- प्रति अर्ज, अल्प उत्पन्न गटाकरिता रु. २५,३३६ प्रति अर्ज, मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. ५०,३३६ प्रति अर्ज, उच्च उत्पन्न गटाकरिता रु. ७५,३३६ प्रति अर्ज आकारली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन अर्जापोटी प्रतिअर्ज रु. ३३६ (विना परतावा) अर्ज शुल्काचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी कुठे घरे? यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रतीक्षा नगर- सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरिवली या ठिकाणी एकूण आठ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. अल्प उत्पन्न गटासाठी कुठे घरे? अल्प उत्पन्न गटाकरिता कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली (पश्चिम), सिद्धार्थ नगर - गोरेगाव (पश्चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी मालाड येथील १९२ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी कुठे घरे? मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रतीक्षा नगर- सायन, सिद्धार्थ नगर - गोरेगाव (पश्चिम), उन्नत नगर- गोरेगाव (पश्चिम), चारकोप कांदिवली (पश्चिम), गायकवाड नगर- मालवणी मालाड येथील एकूण २८१ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. उच्च उत्पन्न गटासाठी कुठे घरे? तर उच्च उत्पन्न गटाकरिता लोअर परेल - मुंबई, तुंगा - पवई, चारकोप कांदिवली (पश्चिम), शिंपोली -कांदिवली (पश्चिम) येथील एकूण ३३८ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. कुठे किती घरं? अत्यल्प गट 8 घरं : प्रतीक्षा नगर- सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरिवली अल्प उत्पन्न गट 192 घरं: कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप  कांदिवली (पश्चिम), सिद्धार्थ नगर - गोरेगाव (पश्चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी मालाड मध्यम उत्पन्न गट 281 घरं: प्रतीक्षा नगर- सायन,  सिद्धार्थ नगर - गोरेगाव (पश्चिम),  उन्नत नगर- गोरेगाव (पश्चिम), चारकोप कांदिवली (पश्चिम), गायकवाड नगर- मालवणी मालाड उच्च उत्पन्न गट 338 घरं: लोअर परेल - मुंबई, तुंगा - पवई, चारकोप  कांदिवली (पश्चिम), शिंपोली - कांदिवली (पश्चिम)  कोणत्या गटासाठी किती घरं?
  • अत्यल्प उत्पन्न गट – 8 घरं
  • अल्प उत्पन्न गट – 192 घरं
  • मध्यम उत्पन्न गट – 281 घरं
  • उच्च उत्पन्न गट – 338 घरं
  • एकूण - 819
www.abpmajha.in  डिपॉझिट किती?
  • अत्यल्प उत्पन्न गट –  15 हजार 336 रुपये
  • अल्प उत्पन्न गट – 25 हजार 336 रुपये
  • मध्यम उत्पन्न गट – 50 हजार 336 रुपये
  • उच्च उत्पन्न गट – 75 हजार 336 रुपये
www.abpmajha.in कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा :
  • अत्यल्प उत्पन्न गट –  25,000
  • अल्प उत्पन्न गट – 25001 ते 50000 रुपये
  • मध्यम उत्पन्न गट – 50,001 ते 75,000 रुपये
  • उच्च उत्पन्न गट – 75,001 पेक्षा जास्त
घरांच्या किमती
  • अत्यल्प उत्पन्न गट : 15 ते 20 लाख रुपयांदरम्यान
  • अल्प उत्पन्न गट : 23 ते 35 लाख रुपयांदरम्यान
  • मध्यम उत्पन्न गट : 36 लाख ते 56 लाख रुपये
  • उच्च उत्पन्न गट : 72 लाख ते 1 कोटी 96 लाख
महत्त्वाच्या तारखा:
  • ऑनलाईन नोंदणी – 16 सप्टेंबर 2017 पासून
  • ऑनलाईन नोंदणी अंतिम तारीख – 21 ऑक्टोबर 2017
  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात – 17 सप्टेंबर 2017 पासून
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 22 ऑक्टोबर 2017 पर्यंत
  • ऑनलाईन पैसे भरण्याची मुदत – 24 ऑक्टोबर 2017
  • डीडी किंवा पे ऑर्डरने पैसे भरण्याची अंतिम तारीख – 25 ऑक्टोबर 2017
  • लॉटरीची तारीख – 10 नोव्हेंबर 2017
संबंधित बातमी म्हाडा लॉटरी: पगार दीड लाख, तरीही आमदारांना अल्प गटात राखीव घरं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
Shrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?
Shrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nalasopara Achola Vasant nagri | नालासोपाऱ्यातील आचोळा वसंत नगरीत 41 इमारतींवर पालिकेची तोडक कारवाईAjit Pawar Full PC : मी ज्योतिषी नाही, मुख्यमंत्रि‍पदाच्या प्रश्नावर अजित पवार संतापले ABP MajhaShrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 28 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
Shrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?
Shrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
Mohammed Siraj On RCB : आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
Dhananjay Munde : नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
Embed widget