Mumbai Local Updates : एका बांबूमुळे ओव्हरहेड वायर तुटली; प्रवाशांवर ट्रॅकवरुन पायपीट करण्याची वेळ, मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशीरानं
Mumbai Local: ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्यानं मध्य रेल्वेचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं. प्रवाशांवर ट्रॅकवरुन पायपीट करण्याची वेळ आली.
Mumbai Local Updates : मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेची रखडपट्टी झाल्यानं प्रवाशांना रेल्वे ट्रॅकव्हर उतरून पायपीट करावी लागत आहे. साधारणतः ओव्हर हेड वायरवर (Over Head Wire) बांबू पडल्यानं सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व फास्ट लोकल (Fast Local) माटुंग्याला (Matunga Station) खोळंबलेल्या. सर्व लोकल एकापाठोपाठ एक थांबल्या होत्या. एवढंच नाहीतर काही एक्सप्रेस गाड्याही थांबल्याचं पाहायला मिळालं होतं. वेळत ऑफिस गाठण्यासाठी लोकलमधील प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून पायपीट सुरू केली.
ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. सध्या ओव्हरहेड वायरवर पडलेला बांबू काढण्यात यश आलं आहे. पण तरिदेखील मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिरानं सुरू आहे.
माटुंगा स्टेशननजिक एक कन्स्ट्रक्शन साईट आहे. या कन्स्ट्रक्शनसाठी काही बांबू वापरण्यात आले आहेत. त्यापैकीच काही बांबू पडून रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कोसळले. त्यामुळे रेल्वेचा खोळंबा झाला. या घटनेमुळे मोठा अपघात होता होता राहिल्याचंही बोलंल जात आहे. सध्या ओव्हरहेड वायरवरील बांबू दूर करण्यात यश आलं असलं तरीदेखील, प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळत आहे. अजूनही रेल्वेसेवा विस्तळीत असून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याचं पाहायला मिळत आहे.
ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्यामुळे मध्य रेल्वेवर मोठी दुर्घटना घडता घडता राहिली. ऐन कामाच्या वेळी रेल्वे खोळंबल्यानं प्रवाशांनी ट्रॅकवर उतरुन पायपीट सुरू केली. सर्व फास्ट लोकल माटुंग्याला एकापाठोपाठ एक उभ्या होत्या. तर काही एक्सप्रेस गाड्याही खोळंबल्या होत्या.
पाहा व्हिडीओ : Mumbai Local Central Railway Matunga : ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्याने मध्यरेल्वेची वाहतूक खोळंबली