Mumbai Local : हार्बर लाईनवर रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या कसं आहे वेळापत्रक
विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई : हार्बर लाईनवर 19 डिसेंबरला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करता सुटणा-या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणा-या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणा-या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
मध्य रेल्वेवर (Central Railway) शुक्रवार, शनिवार आणि रविवारी म्हणजेच ब्लॉक 04, 05 आणि 06 फेब्रुवारी रोजी 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक असून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
72 तासांच्या जम्बो मेगाब्लॉकला सुरुवात, प्रवाश्यांचे मेगा हाल मात्र ब्लॉक नंतर प्रवास होईल सुखकार
Mumbai Locals Block Live Updates : ठाणे-दिवा दरम्यान 72 तासांचा मेगाब्लॉक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha