एक्स्प्लोर

आज रविवार, मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Local Megablock : आज मुंबई लोकलवरील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक.

Mumbai Local Megablock Updates: रविवारी  6 ऑगस्ट, आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. आज मुंबई लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणार असाल, तर घराबाहेर पडण्यापूर्वीच मुंबई लोकलचं वेळापत्रक (Mumbai Local Timetable) पाहून मगच बाहेर पडा. आज मुंबई लोकलच्या मध्य (Central Railway) आणि हार्बर मार्गांवर (Harbour Railway) मेगाब्लॉक आहे. तर पश्चिम रेल्वेकडूनही आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 

मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक 

माटुंगा-ठाणेअप आणि डाऊन मार्गावर सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी स्लो लाईनवरची वाहतूक सकाळी 7.42 ते 01.02 पर्यंत फास्ट ट्रॅकवर वळवण्यात येणार आहे. माटुंगा ते ठाण्यादरम्यान या लोकल सायन. कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलूंड आणि ठाणे येथे थांबतील. या काळात लोकल 15 मिनिटं उशिरानं धावणार आहेत.

सकाळी 7.47 ते दुपारी 12.37 पर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकावर थांबेल. पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येईल आणि या मार्गावरील लोकल 15 मिनिटं उशिरानं गंतव्य स्थानकामध्ये पोहोचतील.

पाहा व्हिडीओ : Railway Mega block : मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडताय? रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

हार्बर लाईनवरही मेगाब्लॉक 

कुर्ला-वाशी अप आणिडाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणारी वाशी/बेलापूर/पनवेल डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला, पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 06 वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

दरम्यान, मुंबई लोकल मार्गांवरील आजचा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?Milind Narvekar Special Report : Uddhav Thackeray यांचा शिलेदार मैदानात,मिलिंद नार्वेकर आमदार होणार?Ambadas Danve Suspension Special Report : शिवीगाळ, राजकारण ते निलंबन; दानवे-लाड प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget