(Source: Poll of Polls)
सर्वात मोठी बातमी! 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेवर 27 तासांचा 'मेगाब्लॉक'; लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द
Mumbai Local Megablock : 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेवर 27 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Local Megablock : मुंबईकरांसाठी (Mumbai News) अत्यंत महत्त्वाची बातमी... उद्यापासून मध्य रेल्वेवर 27 तासांचा मेगाब्लॉक (Megablock News) घेण्यात येणार आहे. सीएसएमटी-मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचं पाडकाम (Mumbai Carnac Bridge To Be Demolished) सुरु करण्यात येणार आहे. या कामानिमित्त मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावरील 1 हजार 96 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कर्नाक पुलाच्या (Carnac Bridge) कामासोबत कोपरी पुलाच्या कामासाठीही वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
गर्डर टाकण्याचे काम शनिवारी-रविवारी मध्यरात्री करण्यात येणार आहे. या कामामुळे सध्या वापरात असलेल्या दोन्ही बाजूंच्या पुलांवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई आणि मुंबई-नाशिक या दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
आज म्हणजेच, शुक्रवारी रात्री 11 वाजल्यापासून मेगाब्लॉक सुरू होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी काही उपनगरीय गाड्या भायखळा ते ठाणे दरम्यान धावतील. रेल्वेनं प्रवाशांना इतर मार्गांवरुन प्रवासाचं नियोजन करण्याचं आवाहन केलं आहे. मुंबई लोकल व्यतिरिक्त, लांब मार्गावरील वाहतूक देखील या मेगाब्लॉकमुळे प्रभावित होणार आहे.
पाहा व्हिडीओ : शनिवारपासून लोकल मार्गांवर तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक
मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, रोड ओव्हर ब्रिज (ROB) तोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि भायखळा स्थानकांदरम्यान 19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत मुख्य मार्गावर 27 तासांच्या मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेनं शुक्रवारी दिली आहे. रेल्वे प्राधिकरण मोहम्मद अली रोडला पी डी'मेलो रोडला जोडणारा कर्नाक उड्डाणपूलाचं पाडकाम करणार आहे.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हटलं की, "कर्णक पूल पाडण्यासाठी आम्ही 27 तासांचा मेगाब्लॉक घेत आहोत, मात्र आम्ही मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावरील सेवा निर्धारित वेळेपूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न करू. आम्ही मुख्य मार्गावरील आमचं काम पूर्ण करण्याचा आणि दुपारी 4 वाजेपर्यंत सेवा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू, तसेच हार्बर मार्गावरील सेवाही आम्ही 20 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mega Block: औरंगाबादेतून जाणाऱ्या 12 रेल्वे रद्द, मराठवाड्यातील प्रवाशांचे नियोजन विस्कळीत