एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो... उद्या तीनही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, रुळांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी लोकल वेळापत्रकात बदल

Mumbai Local Mega Block News : मुंबईत उद्या तीनही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक. रुळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी उद्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वेळापत्रकात बदल.

Mumbai Local Mega Block News : मुंबईकरांसाठी (Mumbai) महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत उद्या (रविवार, 7 ऑगस्ट) तीनही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) आहे. त्यामुळे उद्या वीकेंडला मुंबईत लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणार असाल तर रेल्वेचं बदललेलं वेळापत्रक जाणूनच प्रवास करा. रुळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी आणि सिग्नल यंत्रणेतील कामासाठी उद्या हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि हार्बरच्या (Harbor Railway) लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो उद्या घराबाहेर पडणार असाल आणि लोकलनं प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर मेगाब्लॉकबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. 

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड यार्डाच्या दिवा मार्गावर रात्रकालीन जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक 

माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पलीकडील जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरानं उशिरानं लोकल धावतील. 

ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत  सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील. पुढे माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15  मिनिटं उशिरानं लोकल धावतील. 

हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक 

पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत (बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून) 
 
पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत  सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
 
पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत  सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणे येथे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा  बंद राहतील.
 
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई - वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल धावतील.
 
ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
 
ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ- खारकोपर मार्गावरील  सेवा उपलब्ध असतील.
 
पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक 

पश्चिम रेल्वे मार्गावर वसई यार्ड ते दिवा अप डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. रात्री 12.15 ते मध्य रात्री 3.15 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे वसई यार्डातील काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला जाणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare On Ajit Pawar : अजित पर्वावर जनतेचं शिक्कामोर्तब  - सुनिल तटकरेSanjay Raut Full PC : महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्येच शपथविधी घ्यावा - संजय राऊतLata Shinde On Election : महायुती जिंकली, गोडा-धोडाचं जेवण करणार; मिसेस मुख्यमंत्र्यांचं सेलिब्रेशनNana Patole Full PC : चमत्कार कसा घडला ते पाहणं महत्त्वाचं - नाना पटोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Embed widget