Mumbai Local Megablock : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर उद्या रविवारी प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.  रविवार असल्यामुळे उद्या धावणाऱ्या लोकलची संख्या काही प्रमाणात कमी असणार आहे. 


असा असणार ब्लॉक
 
मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. 05.06.2022 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे.  माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्ग सकाळी 11.05 ते दुपारी 03.55 पर्यंत  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. नियोजित थांबे घेऊन आपल्या गंतव्य  स्थानकावर पंधरा मिनिटे उशिराने पोहोचतील.


सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. नियोजित थांबे घेऊन आपल्या गंतव्य  स्थानकावर पंधरा मिनिटे उशिराने पोहोचतील. 


पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत (बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून) सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे  सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. 
 
सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्याकडे सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर  मार्गावरील सेवा आणि तसेच सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेलकडे  सुटणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.


ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरूळ दरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा सुरू राहतीलब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ - खारकोपर दरम्यान उपनगरीय सेवा सुरू राहतील.
 
हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात येते की, होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असं मध्य रेल्वेनं म्हटलं आहे.