एक्स्प्लोर

Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक; मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा

Mega Block : आज मुंबईच्या रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक (Mega Block) असणार आहे.

Mumbai Local Mega Block :  मुंबईकरांसाठी खासकरुन जे मुंबईकर लोकलने रोज प्रवास करतात त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आज म्हणजेच रविवारी, 27 नोव्हेंबर रोजी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) घेण्यात आला आहे. त्यामुळे लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणार असाल तर रेल्वेचं बदललेलं वेळापत्रक जाणूनच प्रवास करा. देखभालीचे काम, रुळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी आणि सिग्नल यंत्रणेतील विविध कामासाठी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि हार्बरच्या (Harbour Railway) लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो आज घराबाहेर पडणार असाल आणि लोकलनं प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर मेगाब्लॉकबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या...

माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत  सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन त्यांच्या संबंधित   स्थानकांवर वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पुढे  जलद असलेल्या गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.  

ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन  वेळापत्रकानुसार त्यांच्या संबंधित स्थानकांवर थांबवल्या जातील.  पुढे या अप जलद सेवा अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी  पोहोचतील.

हार्बर मार्गावर कसा आहे ब्लॉक?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाउन  हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 10.48 ते सायंकाळी  4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

महत्वाचं : ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Saleel Kulkarni : सुप्रसिद्ध गायक, संगीतकार सलील कुलकर्णींनं लेकासोबत बजावला मतदानाचा हक्क : ABP MajhaBeed Loksabha Pankaja Munde : बाबांची उर्जा आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहे : पंकजा मुंडेParli Lok Sabha Dhananjay Munde : छोट्या बहिणीला मतदान करताना जो आनंद झालाय तो शब्दात मांडण अशक्यUddhav Thackeray Lok Sabha :   निवडणूक महाभारतासारखी, लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय : उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
Savani Ravindra : मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर गेली पण शाई न लावताच परतली; गायिकेने सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Embed widget