Mega Block : रविवारचा मेगा ब्लॉक; कुठल्या मार्गांवर लोकल सेवा बंद राहणार जाणून घ्या...
Mumbai Local Mega Block :बहुतांश वेळा रविवारी मुंबई लोकलवर मेगा ब्लॉक हा ठरलेलाच असतो. उद्या, रविवारी (29 May Mega block) देखील मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक ठेवण्यात आला आहे.
![Mega Block : रविवारचा मेगा ब्लॉक; कुठल्या मार्गांवर लोकल सेवा बंद राहणार जाणून घ्या... Mumbai Local Mega Block Sunday 29 may local mega block news update Mega Block : रविवारचा मेगा ब्लॉक; कुठल्या मार्गांवर लोकल सेवा बंद राहणार जाणून घ्या...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2017/09/30095125/2-elphinstone-stampede-mumbai-local-train-network-and-its-service.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्वाचं असतं ते लोकलचं वेळापत्रक. रविवारी सुट्टीच्या दिवशी मात्र मेगा ब्लॉकच्या निमित्तानं हे वेळापत्रक बदलून जातं. बहुतांश वेळा रविवारी मुंबई लोकलवर मेगा ब्लॉक हा ठरलेलाच असतो. उद्या, रविवारी (29 May Mega block) देखील मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक ठेवण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक ठेवला जाणार असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे.
असा असेल मेगा ब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी .49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील, भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे डाउन धिम्या मार्गावर वळवल्या जातील.
घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे हार्बर डाउन मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि
चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 पर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.10 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)