Mumbai Local Mega Block : मेनलाईनवरील मेगा ब्लॉक अचानक रद्द, आज फक्त याच मार्गावर ब्लॉक...
Mumbai Local Mega Block आधी घोषित केलेला मध्य रेल्वेच्या मेनलाईनवरील ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. रात्री 12 वाजता ट्विट करत मेन लाईनवरील मेगा ब्लॉक रद्द केल्याची रेल्वेने माहिती दिली आहे.
Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वे मार्गावर शुक्रवारी झालेल्या अपघातामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. आता रेल्वेने रविवारी मेगा ब्लॉक घेतला आहे. मात्र आधी घोषित केलेला मध्य रेल्वेच्या मेनलाईनवरील ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. रात्री 12 वाजता ट्विट करत मेन लाईनवरील मेगा ब्लॉक रद्द केल्याची रेल्वेने माहिती दिली आहे.
हार्बर मार्गावरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असून दिवसा कोणताही ब्लॉक नसेल.
सीएसएमटी ते कल्याण मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार नाही. मात्र, हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक हा अगोदर दिलेल्या महिती नुसार घेण्यात येईल. तो सीएसएमटी - बांद्रा/चुनाभट्टी दरम्यान घेण्यात येईल. रात्री 12 वाजता ट्विट करत मेन लाईनवरील मेगा ब्लॉक रद्द केल्याची माहिती दिली आहे.
मेगा ब्लॉक कुठे आणि कधी?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकरीता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रेहून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.