एक्स्प्लोर

'ओला' ड्रायव्हरचे अश्लील चाळे, तरुणीचा टॅक्सीतून पळ

'मी फोनवर बोलत होते. त्याचवेळी चालकाने टॅक्सी थांबवल्याचं माझ्या लक्षात आलं. मी ड्रायव्हरकडे पाहिलं, त्यावेळी त्याने पँटची झिप उघडून अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली' असा आरोपी तरुणीने केला आहे.

मुंबई : ओला चालकाने धावत्या टॅक्सीत अश्लील चाळे सुरु केल्याने प्रवासी तरुणीने घाबरुन धूम ठोकली. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादहून आलेल्या 30 वर्षीय तरुणीने सोमवारी 'ओला'च्या अॅपवरुन शेअर टॅक्सी बुक केली. मुलाखतीसाठी ती अंधेरीहून परेलला जात होती. टॅक्सीत बसताना सहप्रवासी होते, मात्र आपण शिवाजी पार्क परिसरात पोहचलो त्यावेळी टॅक्सीत एकटीच असल्याचं तक्रारदार तरुणीने सांगितलं. 'मी फोनवर बोलत होते. त्याचवेळी चालकाने टॅक्सी थांबवल्याचं माझ्या लक्षात आलं. मी ड्रायव्हरकडे पाहिलं, त्यावेळी त्याने पँटची झिप उघडून अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली' असा आरोपी तरुणीने केला आहे. घाबरल्यामुळे आपण टॅक्सीबाहेर पळ काढला आणि शक्य तितकं लांब गेलो. पादचाऱ्यांना जवळच्या पोलिस स्थानकाचा पत्ता विचारुन शिवाजी पार्क पोलिस स्टेशन गाठल्याचं तिने सांगितलं. ओला अॅपवरील नोंदणीकृत क्रमांक आणि मोबाईल नंबरवरुन ड्रायव्हरची ओळख पटली आहे. लवकरच आरोपीला बेड्या ठोकू, असं पोलिसांनी सांगितलं. ओला चालकाकडून महिलेचा विनयभंग होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मे महिन्यात बंगळुरुतील ओला चालकाविरोधातही विनयभंगाचा आरोप झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्येMuddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget