Vande Bharat Express : मुंबई- कोल्हापूर प्रवास वेगवान होणार, महाराष्ट्रात आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरु होण्याची शक्यता
Vande Bharat Express : मुंबई पुणे कोल्हापूर या मार्गावर देखील वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरु होणार असल्याची माहिती आहे.
मुंबई : पुणे-हुबळी आणि नागपूर-सिकंदराबाद या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस येत्या काही दिवसात सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंडच्या जमशेदपूर येथून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. महाराष्ट्रातील आणखी एका मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरु होणार आहे. मुंबई - कोल्हापूर (Mumbai Kolhapur Vande Bharat Express) या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होण्याची शक्यता आहे. याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं दिलं आहे.
मुंबई-पुणे- कोल्हापूर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्यास मुंबई आणि पुणे या मार्गावरुन धावणारी ही दुसरी ट्रेन ठरेल. यापूर्वी धावणारी मुंबई- सोलापूर ही वंदे भारत एक्सप्रेस पुणे जंक्शनवरुन पुढे जाते.
मुंबई- कोल्हापूर मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याची कोल्हापूरमधील रेल्वे प्रवासी आणि लोकप्रतिनिधींची मागणी होती. ती मागणी पूर्ण होण्यामध्ये या मार्गामधील रखडलेली रेल्वे ट्रॅकच्या दुहेरीकरणाची आणि विद्युतीकरणाची काम प्रलंबित असल्यानं अडसर होता. विद्युतीकरण आणि दुहेरीकरणाचं काम पूर्ण झाल्यानं या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई - कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्यास प्रवासाचा वेग कमी होणार आहे.
मुंबई कोल्हापूर रेल्वे प्रवासासाठी किती वेळ लागतो?
मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई कोल्हापूर मार्गावर सध्या दोन एक्स्प्रेस धावतात. कोयना एक्स्प्रेस आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस या दोन ट्रेन या मार्गावरुन धावतात. यापैकी महालक्ष्मी एक्स्प्रेसचा वेग अधिक आहे. महालक्ष्मी एक्स्प्रेसला 10.30 तासांचा वेळ लागतो. दोन्ही शहरांमधील अंतर 518 किलोमीटर इतकं आहे. महालक्ष्मी एक्स्प्रेसचा वेग 48.94 किलोमीटर प्रतितास आहे. वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्यास या मार्गावरील प्रवासाचा वेग कमी होईल.
पुणे मिरज मार्गावरील दुहेरीकरणाचं काम पूर्ण झाल्यानं अतिरिक्त वेगानं धावणाऱ्या एक्स्प्रेस चालवणं शक्य होणार असल्याचं म्हटलं. मध्य रेल्वेकडून सध्या मुंबई-सोलापूर, मुंबई- मडगाव, मुंबई साईनगर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस चालवल्या जात आहेत. पश्चिम रेल्वेकडून मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आणि मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस चालवली जाते. यामध्ये पुणे- नागपूर, नागपूर-सिकंदराबाद, पुणे-हुबळी या मार्गांवरील वंदे भारत एक्स्प्रेसची भर पडणार आहे.
दरम्यान, पुणे हुबळी मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार असून या मार्गावर सातारा, सांगली, मिरज, बेळगाव, धारवाड या स्थानकांमध्ये थांबे असतील.
इतर बातम्या :
Layoff : झटक्यात गेली 76 लाखांचा पगार असणारी नोकरी, तरीही मुलगी आनंदीच, नेमकं कारण काय?