एक्स्प्लोर
छेडछाडीच्या भीतीने मुलीची ट्रेनमधून उडी, आरोपी अटकेत
22 ऑक्टोबरला रविवारी सकाळी 9.29 च्या लोकलने पायल सीएसएमटीहून करी रोडला ट्युशन्ससाठी निघाली होती. सीएसएमटीवरुन ट्रेन निघत असतानाच एक तरुण महिलांच्या डब्यात चढला.
मुंबई : छेडछाडीच्या भीतीने 13 वर्षीय मुलीने ट्रेनमधून उडी मारल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी हा सायनचा रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. जीआरपी पोलिसांनी पायलने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचं रेखाचित्र रेखाटलं होतं. त्यानंतर सीएसएमटी आणि मस्जिद बंदर स्टेशनवरील सीसीटीव्ही फूटेडच्या आधारावर आरोपीची ओळख पटवल्याचं पोलिसांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण?
22 ऑक्टोबरला रविवारी सकाळी 9.29 च्या लोकलने पायल सीएसएमटीहून करी रोडला ट्युशन्ससाठी निघाली होती. सीएसएमटीवरुन ट्रेन निघत असतानाच एक तरुण महिलांच्या डब्यात चढला. त्यावेळी पायल लेडीज सेकंड क्लासच्या मिडल कम्पार्टमेंटमध्ये एकटीच होती.
तरुणाने आपल्याला शांत राहण्याची वॉर्निंग दिल्याचं तिने सांगितलं. घाबरुन तिने अलार्म चेन खेचायला सुरुवात केली. ट्रेन थांबत नसल्याने तिचे प्रयत्न सुरुच होते. तर युवक तिला शांत बसण्याची वॉर्निंग देत जवळ जात होता. धीर एकवटून पायल ट्रेनच्या दरवाज्याजवळ गेली.
ट्रेनचा वेग फारसा वाढला नव्हता. तिला ट्रॅकवर काही गँगमन दिसले. ते आपली मदत करतील या विचाराने तिने जीवाच्या आकांताने लोकलमधून उडी मारली. यामध्ये पायलच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिला पाहून गँगमन मदतीला धावले. पायलला सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर नेण्यात आलं. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement