एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ना उद्धव, ना आदित्य, वर्धापनदिनी 'या' नेत्यासोबत फोटो काढण्यासाठी शिवसैनिकांची झुंबड
मात्र या प्रकारानंतर त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी उसळलेली गर्दी बघून उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींमध्ये चांगलीच कुजबूज रंगली होती.
मुंबई : शिवसेनेचा 52वा वर्धापन दिन मंगळवारी (19 जून) सोहळा साजरा झाला. या सोहळ्यात राज्यभरातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत सर्वाधिक फोटो काढण्यासाठी एका व्यक्तीकडे मोठी गर्दी उसळली होती.
त्या व्यक्तीचं नाव ऐकलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यांचं नाव आहे मिलिंद नार्वेकर. होय, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे नाही तर पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकरांसोबत फोटो काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता.
शिवसेनेत नार्वेकरांना याआधीच वेगळं वलय होतं. त्यात पक्षाचं अधिकृत सचिवपद दिल्यामुळे आता मंत्री, खासदार, आमदारांप्रमाणेच कार्यकर्त्यांचाही मिलिंद नार्वेकरांभोवती गराडा पडू लागला आहे.
मात्र या प्रकारानंतर त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी उसळलेली गर्दी बघून उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींमध्ये चांगलीच कुजबूज रंगली होती.
संबंधित बातम्या होय, मी चुकलो, 12 वर्षांपूर्वी शिवसेना सोडणं ही माझी चूक : शिशीर शिंदे स्वबळावर लढायचं, एकहाती सत्ता आणायची : आदित्य ठाकरेVIDEO : मिलिंद नार्वेकरांसोबत फोटो काढण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी pic.twitter.com/XTpeSUUCiJ
— ABP माझा (@abpmajhatv) June 20, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement