एक्स्प्लोर

अभिनेता जॅकी श्रॉफला हायकोर्टाचा मोठा दिलासा, काय आहे नेमकं प्रकरण?

बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफला हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. 10 वर्षांपूर्वीच्या प्रकरणाचा निकाल अखेर जॅकीदादाच्या बाजूनं लागला आहे. आर्बिट्रेटरचा निकाल रद्द करत 35 लाख डॉलर्स अदा करण्याचे आदेश जॅकीच्या बिझनेस पार्टनरला दिले आहेत.

मुंबई : एका कंपनीच्या शेअर्स विक्री व्यवहाराप्रकरणी व्यवसायातील भागिदाराची मानहानी झाल्याने 35 लाख डॉलर्स घेण्यासाठी पात्र नाही असा आदेश देणाऱ्या आर्बिट्रेशन विरोधात हायकोर्टात धाव घेणाऱ्या बॉलिवूडचा स्टार जॅकी श्रॉफला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती शरिष गुप्ते यांनी आर्बिट्रेशनचा निकाल फेटाळून लावत भागिदारानं जॅकीला 35 लाख डॉलर देण्याचे आदेश दिले आहेत. तब्बल 10 वर्षानंतर हे प्रकरण निकाली निघालं आहे.

काय आहे प्रकरण?- 

साल 2010 मध्ये जॅकी श्रॉफ व रतनाम अय्यर हे बिझनेस पार्टनर होते या दोघांकडे मल्टी स्क्रीन मीडिया या कंपनीच्या शेअर्सची मालकी होती. शेअर विकण्यासाठी बँकेनं कागदपत्रांवर जॅकीची सही मागितल्यामुळे जॅकीने पोलिसांकडे धाव घेत बिझनेस पार्टनर अय्यर व इतर काही जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रार मागे घेतल्यानंतर जॅकी श्रॉफला एकूण 35 लाख डॉलर्स देण्याचे सर्वांनी मान्य केले. सुरुवातीला 15 लाख डॉलर्स व उर्वरित 20 लाख डॉलर्स शेअर विकल्यानंतर देण्याचे अय्यर यानं लेखी कबूल केलं. दोघांमध्ये तसा करारही करण्यात आला हा करार करताना दोघांना काही अटी घालण्यात आल्या. शेअर्स विकल्याची माहिती अय्यर याने जॅकीला देणे बंधनकारक असून जॅकीनंही व्यवहार पूर्ण होईपर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करू नये, असं ठरलं. मात्र कराराचे उल्लंघन झाल्याचा दावा करत अय्यर याने आर्बिट्रेशनकडे धाव घेतली त्यानंतर आर्बिट्रेटरने याची दखल घेत जॅकी श्रॉफ भरपाईसाठी पात्र नाही असा निकाल दिला होता.

का झाला वाद?- 

जून 2011 मध्ये हे शेअर्स विकल्याची माहिती मिळाली असून त्याबाबत आपल्याला माहिती न दिल्याचा ई-मेल जॅकीची पत्नी आएशानं अय्यरला धाडला होता. त्या ईमेलला उत्तर देताना अय्यरनं म्हटलं की व्यवहार अद्याप पूर्ण झालेला नाही. तुम्हाला तुमचे दिले जातील त्यानंतर तुम्ही या व्यवहारातून बाहेर पडू शकता. या ईमेलला पुन्हा जॅकीची पत्नी आएशानं रिप्लाय दिला व त्यात असे म्हटले की लबाड आणि फसवणूक व्यक्ती बरोबर सौहार्दाचे व्यवहार करावेसे कोणालाच वाटणार नाही. या पत्रामुळे आपली बेअब्रू झाली असून कराराचंही उल्लंघन झाले आहे, असा दावा करत अय्यरनं आर्बिट्रेटरकडे धाव घेतली. निकाला याचिकाकर्त्याच्या बाजूनं गेल्यानं जॅकीनं अॅड. श्याम देवानी यांच्यामार्फत या निकालाविरोधात हायकोर्टात अपील केलं होतं. या अपीलाची दखल घेत न्यायालयाने आर्बिट्रेटरचा निर्णय अखेर रद्द करत जॅकी श्रॉफला 35 लाख डॉलर्स देण्याचे आदेश रतनाम अय्यरला दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

लोकल ट्रेनमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, धावत्या ट्रेनमध्ये मद्यपीचा धिंगाणा, विठ्ठलवाडी स्थानकातील धक्कादायक प्रकार
लोकल ट्रेनमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, धावत्या ट्रेनमध्ये मद्यपीचा धिंगाणा, विठ्ठलवाडी स्थानकातील धक्कादायक प्रकार
Mumbai : धक्कादायक! उंदराने कुरतडलेली फळं ग्राहकांना विकली, बोरिवली स्टेशन बाहेरील फळविक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल
धक्कादायक! उंदराने कुरतडलेली फळं ग्राहकांना विकली, बोरिवली स्टेशन बाहेरील फळविक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Uddhav Thackeray : लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल
लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget