एक्स्प्लोर
पूर्वीच्या काळी प्रसारमाध्यमं तटस्थ राहायची पण आता ध्रुवीकरणामुळे विभागली : हायकोर्ट
सरकारवर टीका जरूर करा, पण प्रकरण एखाद्याच्या मृत्यूशी निगडीत आहे, याचं भान असू द्या असं हायकोर्टानं म्हटलं आहे.सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील मीडिया ट्रायलविरोधात सुरू असलेल्या सुनावणीत हायकोर्टाने खडे बोल सुनावलेत.
मुंबई : पूर्वीच्या काळात एखादी घटना घडल्यास प्रसारमाध्यमं त्या घटनेकडे तटस्थपणे बघायची पण आता काळ बदलला आहे. माध्यमांचे प्रचंड ध्रुवीकरण झाले असून प्रसारमाध्यमं विविध गटांत विभागली गेली आहेत. अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने मीडिया ट्रायल घेणाऱ्या टीव्ही चॅनेल्सना शुक्रवारी चांगलेच सुनावले. मुळात प्रश्न नियमावलीचा नाही तर यातून काय शिल्लक राहते याचा आहे. लोकं आपली मर्यादा विसरतात पण प्रत्येकाने मर्यादेत राहूनच जे काही करायचे आहे ते केलं पाहिजे. तुम्हाला सरकारवर टीका करायची आहे, जरूर करा पण हे प्रकरण कोणाच्या तरी मृत्यूशी निगडित आहे याचेही भान असू द्या. या प्रकरणात तुम्ही हस्तक्षेप करताय असे तुमच्यावर आरोप आहेत याचंही भान ठेवा, अशा शब्दांत खंडपीठाने टीव्ही न्यूज चॅनल्सचा समाचार घेतला.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मीडिया ट्रायलद्वारे विविध वृत्त प्रसारित केली जात आहेत. त्यामुळे या मीडिया ट्रायलवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते निलेश नवलखा यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तर याप्रकरणात मुंबई पोलिसांची नाहक बदनामी होत असल्यानं अनेक निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी व आणखी एका सेवाभावी संस्थेनंही हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या सर्व याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. त्यावेळी खंडपीठाने काही माध्यमांना खडे बोल सुनावले. दरम्यान सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाबाबत कोणतीही गोपनीय माहिती सीबीआय, एनसीबी किंवा ईडीनं लिक केलेली नाही अशी माहिती केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी खंडपीठाला दिली. तशा आशयाचे प्रतिज्ञापत्रच हायकोर्टात सादर करण्यात आले. आम्हाला आमच्या जबाबदाऱ्यांची पूर्ण जाणीव आहे त्यामुळे तपासयंत्रणेद्वारे माध्यमांत माहिती लिक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असा युक्तिवाद एएसजी अनिल सिंह यांनी केला. हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत तहकूब केली.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement