एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

नव्या वाहनांनाही फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक का नाही? : हायकोर्ट

केवळ 15 वर्ष जुन्या वाहनांनाच फिटनेस सर्टिफिकेट अनिवार्य का? नव्या वाहनांना का नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं उपस्थित केला

मुंबई : जुन्या वाहनांप्रमाणे नव्या वाहनांनाही फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक आहे. कारनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या भरवशावर नव्या वाहनांची नोंदणी करुन ती वापरण्याची परवानगी देत राज्य सरकारच कायदा मोडत आहे, असं मुंबई हायकोर्टानं म्हटलं. केवळ 15 वर्ष जुन्या वाहनांनाच फिटनेस सर्टिफिकेट अनिवार्य का? नव्या वाहनांना का नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं उपस्थित केला. नवीन वाहनं जरी कंपनीमार्फत पूर्ण तपासणी करुन ग्राहकांपर्यंत पोहचत असली, तरी त्याची खातरजमा करणं ही राज्य सरकारची जबाबदारी नाही का? असा सवालही हायकोर्टानं विचारला. मोटर व्हेइकल अॅक्ट, 1988 ची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, आणि महिन्याभरात नव्या गाड्यांनाही आरटीओमार्फत रजिस्ट्रेशनसोबत फिटनेस सर्टिफिकेट जारी करण्याविषयी आपली भूमिका स्पष्ट करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले. अत्यावश्यक चाचण्या केल्याशिवायच राज्यातील अनेक आरटीओ कार्यालयं वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट देत असल्याच्या विरोधात पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता श्रीकांत कर्वे यांनी यासंदर्भात हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे. खराब अवस्थेतील जुनी वाहनं आणि खासकरुन बस, ट्रक यांसारखी अवजड वाहन रस्त्यांवर बिनदिक्कत वावरत असल्यानं रस्त्यांवरील अपघातांच प्रमाण वाढत चाललं आहे. आरटीओच्या हलगर्जीमुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागत आहेत, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. राज्यातील सर्वच्या सर्व 49 आरटीओमध्ये 250 मीटर्सचा टेस्ट ट्रॅक असणं अनिवार्य आहे, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. या ट्रॅकवर 40 किमीच्या वेगान वाहन चालवून त्याची संपूर्ण चाचणी करुन मगच फिटनेस सर्टिफिकेट द्यावं, असं मोटर व्हेइकल अॅक्टमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : रश्मी शुक्ला, अदानी ते महायुती सरकार;संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया #abpमाझाTop 90 At 9AM 26 November 2024 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्या #abpमाझाSharad Pawar-Uddhav Thackeray : शरद पवार आणि उद्धव ठाकरे पराभूत उमेदवारांसोबत करणार चिंतनABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 26 November 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
PAN 2.0 Project : मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
Nagraj Manjule : खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
Embed widget