छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 247 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त, DRI ची कारवाई
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) कारवाई करत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 247 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केलं.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 247 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ही कारवाई केली आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स पोहोचवले जात असल्याचा डीआरआयला संशय आहे. आत्तापर्यंतची एअरपोर्टवर इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स पकडण्याची ही सगळ्यात मोठी कारवाई आहे. या प्रकरणात डीआरआयने झिंबाब्वेमधील दोन नागरिकांना ताब्यात घेतल आहे, ज्यामध्ये एक महिला (वय 46) आणि एक पुरुष (वय 27) यांचा समावेश आहे.
हे दोन्ही झिम्बाब्वेचे नागरिक वेगवेगळ्या फ्लाईटने निघाले होते आणि एडिस अबाबा मधून कन्साईमेंटला घेऊन फ्लाईट ने मुंबईला पोहोचले. या दोघांना अटक केल्यानंतर यांच्याकडून 35 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. डीआरआयने एआययुला केस हॅन्ड ओव्हर केली आहे. आता या स्मगलिंग रॅकेटचा शोध घेतला जात आहे.
गेल्या आठवड्यात 42.86 कोटी रुपयांचे 3,646 आयफोन्स जप्त
गेल्या आठवड्यात मुंबई विमानतळावर 3,646 आयफोन-13 जप्त करण्यात आले आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ही कारवाई केली आहे असून या आयफोन्सची किंमत जवळपास 42.86 कोटी रुपये एवढी आहे. हे सर्व फोन सिंगापूरवरुन मुंबईत विमानतळावर आणण्यात आले होते. महत्वाची बाब म्हणजे कागदपत्रांमध्ये या कन्साईन्मेंटमध्ये मेमरी कार्ड असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, ज्यावेळी तपासणी करण्यात आली तेव्हा त्यात तब्बल 3 हजार 646 ‘iPhone 13’ आढळून आल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :