Mumbai Grant Road Fire: मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात लाकडाच्या गोदामाला भीषण आग, एकाचा मृत्यू
Mumbai Grant Road Fire: लाकडाचे गोदाम या आगीत जळून खाक झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
Mumbai Fire : मुंबईच्या (Mumbai Fire) ग्रँट रोड (Grant Road) परिसरात भीषण आग लागली आहे. मध्यरात्री लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली असून आगीचं कारण अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळण्याचे काम अजूनही सुरूच आहे. एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. खबरदारी म्हणून प्लॅटिनम मॉल आणि रहिवासी इमारती खाली करण्यात आल्या आहे. 16 अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
या घटनेची माहिती मिळताच 16 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर ही आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु झाले. लाकडाचे गोदाम या आगीत जळून खाक झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
#UPDATE | Mumbai, Maharashtra: A total of 16 fire engines and 2 lines from a high-rise building are in operation. Due to flames, a nearby mall and a high-rise building have been vacated. No injuries have been reported so far: Mumbai Fire Service https://t.co/ATOqEe1Ja8
— ANI (@ANI) January 26, 2024
नेमकं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील ग्रॅट रोड परिसरात लाकडाच्या गोदामास मध्यरात्री तीनच्या सुमारास लाकडाच्या गोदामाला आग लागली. लाकडाचे गोदाम असल्याने आग वेगाने पसरत गेली. तसेच या आगीच्या परिसरात एकच खळबळ माजली. दरम्यान ही आग लागल्यानंतर स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती कळवली. अग्निशमन दल, रुग्णवाहिका, कर्मचारी आणि महापालिका कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले.
#UPDATE | One death has been reported so far in the fire that broke out at a restaurant in Kamathipura, Grant Road. One unknown male person's charred body was found in the bathroom at said premises and was moved to J.J. Hospital in Amb 108. Enquiry about any other injured or… https://t.co/w7Bb9XKNFe
— ANI (@ANI) January 26, 2024
मुंबईतील सांताक्रुझ परिसरात अग्नितांडव, एकाचा मृत्यू
मुंबईतील (Mumbai) सांताक्रुझ पश्चिममध्ये काल धीरज हेरिटेज या इमारतीच्या बेसमेंटमध्ये मोठी आग लागली. दरम्यान संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास ही आग लागली. धीरज हेरिटेज इमारतीच्या बेसमेंटमध्ये पार्क केलेल्या गांड्यांमध्ये ही आग लागल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पार्किंगमधून ही आग पहिल्या मजल्यापर्यंत पोहचली. ही कमर्शियल इमारत असून या इमारतीमध्ये असलेल्या नागरिकांना सांताक्रुझ पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले आहे. तसेच या आगीमध्ये एका 45 वर्षीय महिलेचा मृ्त्यू झाला.
हे ही वाचा :
Mumbai Fire : मुंबईतील सांताक्रुझ परिसरात अग्नितांडव, एका महिलेचा मृत्यू तर गाड्या जळून खाक