एक्स्प्लोर
जेव्हा नात शरद पवारांच्या गाडीचं सारथ्य करते...
एरवी एखादा कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवार नेहमी कार्यकर्ते किंवा नेत्यांना गाडीत सोबत घेऊन इतर ठिकाणी जातात. मात्र यावेळी त्यांच्यासोबत गाडीत कोणताही नेता किंवा कार्यकर्ता नव्हता.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेनंतर एक अनोखं चित्र पाहायला मिळालं. शरद पवारांच्या गाडीचं सारथ्य त्यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती करत होती.
एरवी एखादा कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवार नेहमी कार्यकर्ते किंवा नेत्यांना गाडीत सोबत घेऊन इतर ठिकाणी जातात. मात्र यावेळी त्यांच्यासोबत गाडीत कोणताही नेता किंवा कार्यकर्ता नव्हता. तर चक्क शरद पवारांची नात आजोबांना आपल्यासोबत न्यायला आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातील पत्रकार परिषदेनंतर, शरद पवार नात आणि मुलगी सुप्रिया सुळे यांच्यासोबत 'सिल्वर ओक' या दक्षिण मुंबईतल्या घरी परतले. यावेळी गाडीचं स्टेअरिंग पवारांच्या नातीकडे म्हणजेच रेवतीकडे होतं.
कार्यकर्त्यांबरोबरच माध्यमांच्या प्रतिनिधींनाही हे दुर्मिळ क्षण कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह आवरला नाही. आजोबांच्या गाडीचं सारथ्य करणाऱ्या नातीची दृश्यं त्यांनी तातडीने कॅमेऱ्यात कैद केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement