एक्स्प्लोर

मुंबई जीपीओचा जीर्णोद्धार होणार, तक्रारीनंतर प्रस्ताव मंजूर

अनिल गलगली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांस पाठविलेल्या पत्रात साकडे घातले होते की मुंबई जीपीओ इमारतीचे महत्व आगळेवेगळे असून प्रस्ताव मंजूरी अभावी 1000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत दैनंदिन कामासाठी येणाऱ्या नागरिकांचे जीवितांस धोका आहे.

मुंबई : मुंबई जीपीओच्या इमारतीत प्लास्टर आणि इमारतीचा काही भाग धोकादायक झाला आहे. या इमारतीत एक हजाराहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. अशी परिस्थिती असताना मुंबई जीपीओचा संरक्षण, जीर्णोद्धार आणि देखभालीच्या 47.58 कोटींच्या प्रस्तावास पोस्टल संचालनालयाची मंजूरी गेल्या 34 महिन्यापासून मिळत नसल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केल्यानंतर पोस्टल संचालनालयाने रखडलेला मुंबई जीपीओचा जीर्णोद्धार प्रस्ताव मंजूर करत 58 कोटी मंजूर केले आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई जीपीओकडे मुंबई जीपीओ इमारतीच्या देखभालीबाबत माहिती विचारली होती. मुंबई कार्यालयाने सर्वप्रथम 29 जानेवारी 2016 रोजी प्रस्ताव बनविला गेला आणि 10 मार्च 2016 रोजी प्रशासकीय मंजूरीसाठी पोस्टल संचालनालयाकडे पाठविला. मुंबई जीपीओचा संरक्षण, जीर्णोद्धार आणि देखभालीचा प्रस्ताव 47 कोटी 58 लाख 52 हजार 560 इतका असून हा प्रस्ताव इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज यांच्याकडून प्राप्त झाला आहे. प्रत्येक वर्षी 10 ते 15 टक्के खर्चात वाढ होणे अपेक्षित आहे. सदर संस्था पोस्टल विभागाच्या पॅनलवर आहे. पोस्टल संचालनालयाने फक्त 30 लाखांचा निधी वितरित तर केला पण मंजूरीच दिली नाही. ही माहिती मुंबई जीपीओ विधी आणि इमारत खात्याने अनिल गलगली यांना दिली आहे. मुंबई शहरातील ज्या 633 इमारत हेरिटेज आहेत ज्यापैकी ज्या 4 हेरिटेज इमारत व्यवस्थित संरक्षित केलेल्या नाहीत. त्यात मुंबई जीपीओ इमारतीचा सुद्धा समावेश आहे. वर्ष 2008-2009 मध्ये प्रसिद्ध आर्किटेक आभा लांबा आणि भारत पुरातनशास्त्र सर्वेक्षण विभागाचा सुद्धा सल्ला घेतला होता. त्यांनी तात्काळ मुंबई जीपीओ इमारतीचे संरक्षण, जीर्णोद्धार आणि देखभालीची आवश्यकता सांगितली होती. मुंबई जीपीओ इमारतीत अनेक दुर्घटना झाल्या असून एका पीडित व्यक्तीने वर्ष 2012 मध्ये सिव्हिल सूट सुद्धा न्यायालयात दाखल केले आहे. अनिल गलगली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांस पाठविलेल्या पत्रात साकडे घातले होते की, मुंबई जीपीओ इमारतीचे महत्व आगळेवेगळे असून प्रस्ताव मंजूरी अभावी 1000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत दैनंदिन कामासाठी येणाऱ्या नागरिकांचे जीवितांस धोका आहे. अनिल गलगली यांची आरटीआयमधून काढलेली माहिती आणि त्यानंतर केलेल्या तक्रारीनंतर पोस्टल संचालनालयाने अखेर 58 कोटी मंजूर केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Mohan Bhagwat : संघप्रमुख मोहन भागवत 'जेन झी'शी संवाद साधणार, 2000 युवा मुंबईत एकवटणार
संघप्रमुख मोहन भागवत 'जेन झी'शी संवाद साधणार, 2000 युवा मुंबईत एकवटणार
Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Embed widget