एक्स्प्लोर

Mohan Bhagwat : संघप्रमुख मोहन भागवत 'जेन झी'शी संवाद साधणार, 2000 युवा मुंबईत एकवटणार

Mohan Bhagwat Mumbai Visit : जगातील सर्वात मोठ्या युवा-नेतृत्व परिषदेचे एनएमएसीसीमध्ये (NMACC) आयोजन करण्यात आलं असून 100 शहरांतील 2,000 हून अधिक विद्यार्थी एकत्र येणार आहेत.

मुंबई : भारतातील तरुण पिढी आज लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीच्या चर्चांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत असतानाच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) 6 ऑगस्ट रोजी मुंबईत तरुण पिढीशी थेट संवाद साधणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील निता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात (NMACC) 'जनरेशन झी' (Gen Z) आणि 'जनरेशन अल्फा' (Gen Alpha) च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

'इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन्स' (IIMUN) च्या 15 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या भव्य वार्षिक चॅम्पियनशिप परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

IIMUN Youth Conference : जगातील सर्वात मोठी युवा-नेतृत्व परिषद

या तीन दिवसीय परिषदेत देशभरातील 100 हून अधिक शहरांमधील 15 ते 19 वयोगटातील तब्बल 2,000 पेक्षा जास्त हायस्कूल आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ही परिषद जगातील सर्वात मोठ्या युवा-नेतृत्वाखालील संमेलनांपैकी एक मानली जाते.

IIMUN Foundation : आयआयएमयूएनची (IIMUN) यशस्वी वाटचाल

2011 मध्ये ऋषभ शाह यांनी स्थापन केलेले आयआयएमयूएन (IIMUN) हे 'भारत' या संकल्पनेचा जागतिक पातळीवर प्रसार करणारे व्यासपीठ आहे. गेल्या 15 वर्षांपासून 15 ते 24 वयोगटातील तरुणच ही संस्था पूर्णपणे चालवत आहेत. या व्यासपीठावरून घडलेले अनेक तरुण पुढे जाऊन लोकप्रतिनिधी, आयएएस, आयपीएस अधिकारी, वकील, लेखक आणि उद्योगपती बनले आहेत.

IIMUN Eminent Advisory Board : सल्लागार मंडळात दिग्गजांचा समावेश

आयआयएमयूएनच्या सल्लागार मंडळात उद्योग, न्यायव्यवस्था आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये उद्योगपती अजय पिरामल, दीपक पारेख, नादिर गोदरेज, खासदार डॉ. शशी थरूर, माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, चित्रपट दिग्दर्शक करण जोहर, माजी लष्करप्रमुख आणि ऑलिम्पिकपटू पी. टी. उषा यांसारख्या नामवंत व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Mohan Bhagwat : संघप्रमुख मोहन भागवत 'जेन झी'शी संवाद साधणार, 2000 युवा मुंबईत एकवटणार
संघप्रमुख मोहन भागवत 'जेन झी'शी संवाद साधणार, 2000 युवा मुंबईत एकवटणार
Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Embed widget