एक्स्प्लोर

सोन्याच्या तस्करीचा डाव उधळला, महसूल गुप्तचर संचालनालयाकडून 36 किलो सोनं जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याची तस्करी करणाऱ्या एका गटाचा डाव उधळला असून त्यामध्ये सुमारे 21 कोटी रुपयांचे 36 किलो सोने हस्तगत केलं आहे.

मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence) धडक कारवाई करत सोन्याच्या तस्करीचा डाव उधळून लावला आहे. या तस्करीशी संबंधित विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत 21 कोटी रुपयांचे 36 किलो सोने जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 

मुंबई विमानतळ आणि एअर कार्गो संकुलामधील सोन्याच्या तस्करीच्या विविध प्रकरणांशी संबंधित तपासादरम्यान काही परदेशी नागरिकांच्या गटाकडून तस्करी केलेल्या सोन्यावर प्रक्रिया आणि त्याचे वितरण करत असल्याची गुप्त माहिती मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या तस्करी केलेल्या सोन्याची किंमत हवाला मार्गे केली जात असल्याची माहिती देखील प्राप्त झाली होती.  

ही तस्करी उधळून लावण्यासाठी काही परदेशी नागरिक आणि संशयित भारतीय नागरिकांच्या प्रवासाच्या विशिष्ट पद्धतीवर डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने काळजीपूर्वक पाळत ठेवली होती. 23 जानेवारी रोजी, डीआरआय मुंबईच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारावर, एक योग्य वेळ साधून आणि समन्वित कारवाईचे नियोजन केले आणि अंमलात आणली. सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत, डीआरआय अधिकार्‍यांच्या पथकाने ज्या संशयित जागेवर तस्करी केलेले सोने वितळणे आणि त्यावर प्रक्रिया केली जात होती, त्या जागेची झडती घेतली. या परिसराची कसून झडती घेतल्यावर प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर असलेले 36 किलोपेक्षा जास्त वजनाचे  बेहिशेबी सोने जप्त करण्यात आले. 

जप्त केलेल्या या सोन्याचे एकूण मूल्य अंदाजे 21 कोटी रुपये इतके आहे. हे सोने विदेशी नागरिकांसह विविध व्यक्तींकडून शरीरात लपवलेल्या कॅप्सूलच्या स्वरूपात, प्रवासी बॅगमधून, कपड्यांमध्ये लपवून तसेच विविध प्रकारच्या मशीनच्या माध्यमातून मिळाले. अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीकडून 20 लाख रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी रोकड खील आढळून आली.   

चौकशी आणि तपासादरम्यान असे आढळून आले की, या सिंडिकेटद्वारे चालवल्या जाणार्‍या कोडच्या आधारे हे सोने दररोज देशातल्या वेगवेगळ्या तस्करांना वितरीत केले जात होते. या तपासात प्राप्त झालेल्या वेगवेगळ्या पुराव्यांमधून, तस्करीसाठी सोने लपवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती उघडकीला आल्या.

देशात वेगवेगळ्या स्वरूपात सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या संघटनांना आळा घालण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence) कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. योग्य पाळत ठेवून, डीआरआयचे अधिकारी सुसूत्रपणे कारवाई करत असल्याचं दिसून येतंय. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget