Mumbai Fire News : मुंबईच्या बोरीवली परिसरातील इमारतीला आग, काही लोकं अडकल्याची माहिती
मुंबईच्या बोरिवली (Borivali Fire News)परिसरात असलेल्या चिकूवाडीमध्ये एका इमारतीला मोठी आग लागली आहे.

Mumbai Fire Udpate : मुंबईच्या बोरिवली (Borivali Fire News)परिसरात असलेल्या चिकूवाडीमध्ये एका इमारतीला मोठी आग लागली आहे. दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून सध्या युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
बोरिवली पश्चिम चिकूवाडी परिसरातील पॅरेडाइज् नावाच्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावर ही आग लागली आहे. इमारतींमधील बहुतांश लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. ही 24 मजली इमारत असून काही लोक अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
