एक्स्प्लोर
मुंबईतील हिरानंदानी टॉवरची आग आटोक्यात
मुंबई : मुंबईच्या कांदिवली पश्चिममधील हिरानंदानी टॉवरला लागलेली आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. या इमारतीच्या 31 आणि 32 व्या मजल्यावर आज दुपारी 12 च्या सुमारास आग झाली होती.
या घटनेत संपूर्ण मजला आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि पाण्याच्या 6 टँकरच्या मदतीने आग आटोक्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच इमारत रिकामी केल्याने जीवितहानी टळली.
हिरानंदानी टॉवर ही कांदिवली पश्चिममधील सर्वात उंच इमारत आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आज लागल्याचा अंदाज रहिवाशांनी वर्तवला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement