एक्स्प्लोर
Advertisement
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मृतांचा आकडा 23 वर
दरम्यान, केईएममध्ये उपचार घेतलेल्या आणखी एकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई : मुंबईच्या एलफिन्स्टन चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 23 वर पोहोचला आहे. सत्येंद्र कनोजिया (वय 35 वर्ष) यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते.
चेंगराचेंगरीत मुंबईकरांचा बळी
एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी सकाळी मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले. सकाळी 9.30 च्या सुमारास फूट ओव्हर ब्रीजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रीज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला.
मेंदूला जबर दुखापत
एलफिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीत सत्येंद्र कनोजिया यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार होते. परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. अखेर आज सकाळी त्यांचं मृत्यू झाला. त्यामुळे या आता दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढून 23 वर पोहोचला आहे.
दरम्यान, केईएममध्ये उपचार घेतलेल्या आणखी एकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
एल्फिन्स्टन- परेल पुलावर नेमकं काय घडलं?
- सकाळी 9.30 च्या सुमारास पावसाची मोठी सर आली.
- त्याचवेळी मध्य रेल्वेवरील परेल आणि पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी लोकल आल्या.
- त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पादचारी पुलावर गर्दी झाली.
- त्याचवेळी पत्रा कोसळल्याचं सांगण्यात आलं.
- गर्दीच्या वेळी मोठा आवाज झाल्याच्या गैरसमजातून धावपळ सुरु झाली.
- ब्रिज पडत असून शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली, लोक मिळेल ती जागा पकडून बाहेर पडू लागले
- एकमेकांना तुडवत लोकांची धावपळ सुरु झाली
- सकाळी 9.30 च्यासुमारास थेट जखमी आणि मृतांचा आकडा समोर आला
- जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
- काही मिनिटांतच मृतांचा आकडा वाढत गेला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
Advertisement