एक्स्प्लोर
दमानियांवर कुठलीही अश्लील टीका नाही, खडसेंचं स्पष्टीकरण
दमानियांनी माझ्यावर आरोप केले. त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. दाऊद म्हटल्यावर इंटरनॅशनल बातमी झाली. त्यामुळे चांगली करमणूक झाली, असं खडसे म्हणाले

मुंबई : आजवर कुठल्याही स्त्रीचा अनादर केला नाही. शिवाय अंजली दमानियांविषयी कुठलंही आक्षेपार्ह विधान केलं नसल्याचं स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं आहे. खडसे यांनी अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसेंना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती.
'आदरणीय, सन्माननीय अंजली दमानिया यांनी आरोपांची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र मी आजवर कुठल्याही स्त्रीचा अनादर केला नाही. अंजली दमानिया केवळ प्रसिद्धीसाठी आरोप करतात. त्यांनी केलेला एकही आरोप सिद्ध झालेला नाही', असं खडसे म्हणाले. पवार आणि तटकरेंविरोधात केलेल्या तक्रारी त्यांनी मागे का घेतल्या, असा सवालही एकनाथ खडसेंनी उपस्थित केला.
एकनाथ खडसे यांना तातडीने अटक करा : अंजली दमानिया
अंजली दमानिया यांनी जमीन प्रकरणात शेतकरी असल्याचं दाखवलं. कोर्टाने एकतर्फी निर्णय दिला. सर्वांचा आक्षेप असला, तरी निर्णय एकतर्फी लागला. शासनाने वरच्या कोर्टात अपील करायचं ठरवलं. मधल्या काळात त्यांनी सुनिल तटकरे आणि अजित पवारांविरोधात हल्लाबोल केला होता. जनहित याचिका दाखल केली. पण फक्त आरोप करायचे आणि नंतर त्यातून बाहेर पडायचं. त्यामागची कारण काय, असा प्रश्न खडसेंनी विचारला. 'दमानियांनी त्यानंतर नाथाभाऊंवर आरोप केले. त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. दाऊद म्हटल्यावर इंटरनॅशनल बातमी झाली. त्यामुळे चांगली करमणूक झाली. त्याची चौकशी झाली... त्यात तथ्य नाही असं समजलं.' असंही खडसे म्हणाले. 'त्यानंतर नाथाभाऊंच्या पीएने लाच घेतल्याचा आरोप केला. चौकशीअंती त्यात काही तथ्य आढळलं नाही. शासनाच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये, म्हणून मी शासनाला चौकशीची विनंती केली. माझ्या जावयाने मोठी लिमोझिन गाडी घेतली. त्यातही काही तथ्य आढळलं नाही. माझ्या जावयाने भोसरीत जमीन घेतली. मी मंत्री असल्यामुळे माझ्या जावयाला फायदा झाला असे आरोप केले. माझा जावई एनआरआय आहे. इथे उद्योग करण्यासाठी कोणी जमिन घेऊ नये का? त्या जमिनीवर अजूनही मूळ मालकाचं नाव आहे.' असं खडसेंनी सांगितलं. पाहा व्हि़डिओ :अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
