Mumbai Drugs Case LIVE Updates : बॉलिवूड एनसीबीच्या रडारवर; सर्व घडामोडी फक्त एका क्लिकवर...
Mumbai Drugs Case LIVE Updates : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी सध्या एनसीबीनं आपला कारवाईचा सपाटा सुरु ठेवला आहे.
LIVE
Background
NCB at Shahrukh Khan House : एनसीबीकडून शाहरुख खानच्या 'मन्नत'वर छापा, सर्च ऑपरेशन सुरु
मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 18 दिवसांपासून अटकेत आहे. अशात एनसीबीकडून याप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. अशातच आज एनसीबीच्या पथकानं शाहरुख खानच्या राहत्या घरी छापा टाकला, अशी माहिती मिळाली होती. परंतु, एनसीबीकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार, शाहरुख खानच्या मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसून, काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या घरी गेलं होतं.
आज शाहरुख खाननं आर्थर रोड तुरुंगात जाऊन मुलगा आर्यन खानची भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच एनसीबीच्या पथकाकडून बॉलिवूडच्या आताच्या यंग सिनेकलाकारांमधील प्रसिद्ध अशा अनन्या पांडेच्या घरीही छापेमारी करण्यात आली. याशिवाय, दुपारी 2 वाजता अनन्या पांडेला चौकशीसाठी एनसीबीनं समन्स बजावलंय. त्यामुळे एनसीबी बॉलिवूडमधील आणखी कोण-कोणत्या बड्या चेहऱ्यांवर कारवाई करणार, याकडे सिनेसृष्टीसह सामान्य जनतेचंही लक्ष लागलं आहे.
आर्थर रोड तुरुंगात शाहरुख-आर्यनची 10 मिनिटं भेट
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा अर्ज काल सत्र न्यायालयाकडून फेटाळला गेला. त्यानंतर आज आर्यनची भेट घेण्यासाठी शाहरुख खान स्वत: आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला. शाहरुखनं दहा मिनिटं आर्यनशी संवाद केला. कालही जामीन अर्ज फेटाळल्यानं क्रूज ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये राहावं लागणार आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज काल मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत. काल न्यायालयात कोणताही युक्तिवाद झाला नाही. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या वकिलांनी यापूर्वीच पूर्ण केले होते. सुनावणी पूर्ण झाल्यावर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. न्यायाधीशांनी कोर्टात आल्यावर थेट निर्णय जाहीर केला होता.
सध्या बॉलिवूड एनसीबीच्या रडारवर आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी गेल्या 18 दिवसांपासून बॉलिवूडचा किंग खानचा मुलगा आर्यन खान अटकेत आहे. अशातच आज शाहरुख खाननं आर्थर रोड तुरुंगात जाऊन मुलाची 10 मिनिटांसाठी भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच बॉलिवूडची नवोदित अभिनेत्री आणि अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेच्या घरी एनसीबीनं छापा टाकत झाडाझडती घेतली. एवढंच नाहीतर दुपारी दोन वाजता चौकशीला उपस्थित राहण्यासाठी अनन्या पांडेला एनसीबीनं समन्स बजावलं आहे.
आज शाहरुख खाननं आर्थर रोड तुरुंगात जाऊन मुलगा आर्यन खानची भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच एनसीबीच्या पथकाकडून बॉलिवूडच्या आताच्या यंग सिनेकलाकारांमधील प्रसिद्ध अशा अनन्या पांडेच्या घरीही छापेमारी करण्यात आली. याशिवाय, दुपारी 2 वाजता अनन्या पांडेला चौकशीसाठी एनसीबीनं समन्स बजावलंय. त्यामुळे एनसीबी बॉलिवूडमधील आणखी कोण-कोणत्या बड्या चेहऱ्यांवर कारवाई करणार, याकडे सिनेसृष्टीसह सामान्य जनतेचंही लक्ष लागलं आहे.
अनन्या पांडेच्या घरी एनसीबीकडून लॅपटॉपसह इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जप्त
आज एनसीबीच्या पथकानं अनन्या पांडेच्या घरी छापेमारी केली. तसेच दुपारी दोन वाजता चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्सही बजावलं आहे. अशातच एनसीबीनं अनन्याच्या घरी केलेल्या छापेमारीत लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जप्त केले आहेत.
आज शाहरुख खाननं आर्थर रोड तुरुंगात जाऊन मुलगा आर्यन खानची भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच एनसीबीच्या पथकाकडून बॉलिवूडच्या आताच्या यंग सिनेकलाकारांमधील प्रसिद्ध अशा अनन्या पांडेच्या घरीही छापेमारी करण्यात आली. याशिवाय, दुपारी 2 वाजता अनन्या पांडेला चौकशीसाठी एनसीबीनं समन्स बजावलंय. त्यामुळे एनसीबी बॉलिवूडमधील आणखी कोण-कोणत्या बड्या चेहऱ्यांवर कारवाई करणार, याकडे सिनेसृष्टीसह सामान्य जनतेचंही लक्ष लागलं आहे.
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर नवाब मलिकांनी नवे आरोप
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर नवाब मलिकांनी नवे आरोप केलेत. कोरोनाच्या काळात बॉलिवूड इंडस्ट्री मालदिवमध्ये होती. आणि यावेळीच बॉलिवूड सेलिब्रिटींशी संबंधित प्रकरण सेटल करण्यात आली असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी केलाय. समीर वानखेडेंची बहीण जास्मिन यांचे मालदिवमधले फोटो मलिकांनी जाहीर केलेत. तर समीर वानखेडेंची बहीण जास्मिन यांनी मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय.
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी NCB कडून छापेमारी
Mumbai Drug Case : सध्या बॉलिवूड एनसीबीच्या रडारवर आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी गेल्या 18 दिवसांपासून बॉलिवूडचा किंग खानचा मुलगा आर्यन खान अटकेत आहे. अशातच आज शाहरुख खाननं आर्थर रोड तुरुंगात जाऊन मुलाची 10 मिनिटांसाठी भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच बॉलिवूडची नवोदित अभिनेत्री आणि अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेच्या घरी एनसीबीनं छापा टाकत झाडाझडती घेतली. एवढंच नाहीतर दुपारी दोन वाजता चौकशीला उपस्थित राहण्यासाठी अनन्या पांडेला एनसीबीनं समन्स बजावलं आहे.
आज शाहरुख खाननं आर्थर रोड तुरुंगात जाऊन मुलगा आर्यन खानची भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच एनसीबीच्या पथकाकडून बॉलिवूडच्या आताच्या यंग सिनेकलाकारांमधील प्रसिद्ध अशा अनन्या पांडेच्या घरीही छापेमारी करण्यात आली. याशिवाय, दुपारी 2 वाजता अनन्या पांडेला चौकशीसाठी एनसीबीनं समन्स बजावलंय. त्यामुळे एनसीबी बॉलिवूडमधील आणखी कोण-कोणत्या बड्या चेहऱ्यांवर कारवाई करणार, याकडे सिनेसृष्टीसह सामान्य जनतेचंही लक्ष लागलं आहे.
शाहरुख खानच्या घरी एनसीबीचं सर्च ऑपरेशन
NCB at Shahrukh Khan Home : मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 18 दिवसांपासून अटकेत आहे. अशात एनसीबीकडून याप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. अशातच आज एनसीबीच्या पथकानं शाहरुख खानच्या राहत्या घरी छापा टाकला, अशी माहिती मिळाली होती. परंतु, एनसीबीकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार, शाहरुख खानच्या मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसून, काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या घरी गेलं होतं.
कारागृहात मुलाला पाहून भावूक झाला शाहरुख खान
क्रूझ पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा अर्ज काल सत्र न्यायालयाकडून फेटाळला गेला. एनसीबीनं अटक केल्यापासून आर्यन खानला आपल्या कुटुंबियांचा चेहरा पाहता आला नव्हता. मात्र आज स्वतः शाहरुख खाननं आर्थर रोड कारागृह गाठत मुलगा आर्यनची भेट घेतली. यावेळी दोघेही भावूक झाल्याची माहिती मिळाली आहे. आर्यनला भेटल्यानंतर शाहरुखनं त्याला काही खाल्लस का? असं विचारलं. आर्यननं 'नाही' असं उत्तर देताच शाहरुखनं कारागृह अधिकाऱ्यांना आम्ही आर्यनला काही खाण्यासाठी देऊ शकतो का अशी विचारणा केली. मात्र अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या नियमांकडे बोट दाखवलं.