Cycle On Rent Mumbai: गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत दोन नवीन मेट्रो मार्गांना हिरवा झेंडा दाखवला. मुंबई दहिसर-कांदिवली-गोरेगाव मेट्रो मार्ग आठ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर शनिवारपासून मुंबईकरांसाठी सुरू झाला आहे. मेट्रोसोबतच मुंबईकरांना राज्य सरकारने आणखी एक भेट दिली आहे. 


मुंबईत नवीन मेट्रो स्थानके बांधण्यात आली आहेत. तेथून लोकांना त्यांच्या घरी किंवा कार्यालयात जाण्यासाठी बस किंवा ऑटो रिक्षाने जाण्यात अनेकवेळा अडचण होते. हे लक्षात घेऊन मेट्रो स्थानकावर सायकल सुविधा सुरू करण्यात आली आहे. सायकलची ही सुविधा मेट्रो स्टेशनवर My Bike (MYBYK) या अॅपद्वारे सुरू करण्यात आली आहे.


प्रति तास 2 रुपये भाडे 


या सायकलच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये MYBYK नावाचे अॅप डाउनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर अॅपद्वारे तुम्ही या सायकलचे लॉक उघडू शकता आणि लॉक उघडताच तुमचे भाडे सुरू होईल. सायकलचे भाडे खूपच कमी आहे. तुम्ही 2 रुपये प्रति तास सायकल भाड्याने घेऊ शकता.


जोपर्यंत तुमच्याकडे सायकल आहे. तुम्हाला प्रति तास 2 रुपये भाडे द्यावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही सायकल मेट्रो स्टेशनखाली पार्क करू शकता. मेट्रो स्टेशनच्या खाली सायकलची ही सुविधा मुंबईकरांसाठी खूप फायदेशीर ठरेल. यामुळे सतत व्यस्त असणाऱ्या मुंबईकरांचा व्यायामही होईल आणि भाड्यातही बचत होईल.


इतर महत्वाच्या बातम्या:


CM Uddhav Thackeray : संघर्षाची वेळ आणू नका; मुख्यमंत्री उद्धव यांचा भाजपला इशारा


Mumbai Metro: राज्य सरकारच मुंबईकरांना गिफ्ट! मुख्यमंत्र्यांकडून मेट्रोला हिरवा झेंडा


विषय वळवण्यासाठी नको त्या चर्चा घडवल्या जात आहेत, अजित पवार यांची भाजपवर टीका


अजित पवार या प्रश्नाच्या उत्तराला म्हणाले 'नो कॉमेंट्स'


सुख म्हणजे काय असतं, अजित दादांनी सांगितलं


GST Bhavan : मुंबईतलं जीएसटी भवन असणार आहे खास... पर्यावरणपूरक भवनाच्या खासियत जाणून घ्या...