(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime : लॉकडाऊनमुळं मुंबईत गुन्हेगारीचं प्रमाण कमी झालं, मात्र...
लॉकडाऊनमुळे मुंबई शहरात गुन्हेगारीचं प्रमाण खूप कमी झालं आहे, मात्र जरी गुन्हेगारीचं प्रमाण कमी झाले असले तर कोरोना निर्बंधाचे पालन न केल्यामुळे मुंबई शहरात 16 हजारांपेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत.
मुंबई : कोरोनाची दुसऱ्या लाट असल्यामुळे राज्यात सरकारच्या वतीने 31 मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे मुंबई शहरात गुन्हेगारीचं (Mumbai Crime Update) प्रमाण खूप कमी झालं आहे, मात्र जरी गुन्हेगारीचं प्रमाण कमी झाले असले तर कोरोना निर्बंधाचे पालन न केल्यामुळे मुंबई शहरात 16 हजारांपेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान सुरू असतानाही लोकांच्या हलगर्जीपणा कायम आहे. मास्क वापर, सुरक्षित वावर, गर्दी करू नका या निर्बंधांबाबत वारंवार सांगूनही लोकांकडून हे निर्बंध सर्रास पायदळी तुडवले जात आहेत.
दुसऱ्या लाटेमध्ये गेल्या दीड महिन्यात उत्तर मुंबईत सर्वाधिक गुन्हे दाखल झाले असून 5 एप्रिल पासून आत्तापर्यंत 16000 पेक्षा जास्त गुन्हे मुंबई शहरात दाखल झाले आहेत. पहिल्या लाटेदरम्यान मुंबई पोलिसांनी 27 हजारांपेक्षा अधिक गुन्हे दाखल केले होते तर दुसरी लाट येताच राज्य सरकारच्या वतीने मुंबईसह राज्यभरात कडक लॉकडाऊन लावण्यात आला. या लाटेत देखी कोरोनाच्या निर्बंधांचं पालन न केल्यामुळं हजारो गुन्हे दाखल झाले आहेत. यावरुन लोक नियमांचं पालन करत नाहीत असेच स्पष्ट होत आहे.
कशी केली कारवाई
हॉटेल :- दक्षिण 20 गुन्हे नोंद, मध्य 84 गुन्हे नोंद, पूर्व 117 गुन्हे नोंद, पश्चिम 105 गुन्हे नोंद, उत्तर 46 गुन्हे नोंद
सार्वजनिक ठिकाणी गर्दी :- दक्षिण 186 गुन्हे नोंद, मध्य 301 गुन्हे नोंद, पूर्व 208 गुन्हे नोंद, पश्चिम 224गुन्हे नोंद, उत्तर 286 गुन्हे नोंद,
मास्क न वापरणे :- दक्षिण 655 गुन्हे नोंद, मध्य 651 गुन्हे नोंद, पूर्व 997 गुन्हे नोंद, पश्चिम 678 गुन्हे नोंद, उत्तर 631 गुन्हे नोंद
विनाकारण फिरणे :- दक्षिण 1491 गुन्हे नोंद, मध्य 1266 गुन्हे नोंद, पूर्व 685 गुन्हे नोंद, पश्चिम 538 गुन्हे नोंद, उत्तर 1234गुन्हे नोंद,
इतर दुकाने :- दक्षिण 216 गुन्हे नोंद, मध्य 1036 गुन्हे नोंद, पूर्व 721 गुन्हे नोंद, पश्चिम 890 गुन्हे नोंद, उत्तर 1141गुन्हे नोंद,
पान टपरी :- दक्षिण 03 गुन्हे नोंद,मध्य 43 गुन्हे नोंद,पूर्व 23 गुन्हे नोंद,पश्चिम 16 गुन्हे नोंद,उत्तर 25 गुन्हे नोंद,
अवैध वाहतूक :- दक्षिण 22 गुन्हे नोंद, मध्य 8 गुन्हे नोंद,पूर्व 71 गुन्हे नोंद,पश्चिम 3 गुन्हे नोंद,उत्तर 97 गुन्हे नोंद,