एक्स्प्लोर

Mumbai Crime: भारतीयांचा वैयक्तिक डेटा विकणाऱ्या दोघा भावांना मुंबईत अटक; आरोपींची यंत्रणा पाहून पोलिसही चक्रावले 

अवघ्या हजार रुपयांत कोणाचाही वैयक्तिक डेटा उपलब्ध करून देणाऱ्या दोन जणांना मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट सहाने बेड्या ठोकल्या आहेत. 

Mumbai Crime News : तुम्हा आम्हा सर्वांचा वैयक्तिक डेटा (Personal Data) सध्या सुरक्षित नाही. डिजिटलच्या युगात आपला डेटा कितपत सुरक्षित आहे हा मोठा सवालच आहे. मुंबई गुन्हे शाखेनं दोन सख्ख्या भावांना ताब्यात घेतल्यानंतर आपला डेटा कसा आणि कुठवर पोहोचला आहे याबाबत आपल्या कल्पनेच्या पलिकडील माहिती समोर आली आहे. अवघ्या हजार रुपयांत कोणाचाही वैयक्तिक डेटा उपलब्ध करून देणाऱ्या दोन जणांना मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट सहाने बेड्या ठोकल्या आहेत. 

‘Tracenow.co.in’ आणि ‘Fonivotech.com’ या दोन संकेतस्थळांच्या माध्यमातून निखिल येलीगट्टी आणि राहुल येलीगट्टी हे दोन भाऊ भारतीयांची खाजगी माहिती विकत होते. या दोन संकेतस्थळांचा युजर आयडी आणि पासवर्ड 2 हजार रुपये महिना, 12 हजार रुपये 6 महिने आणि वर्षाचे 24 हजार रुपये घेऊन बँक रिकव्हरी कंपन्या आणि इतर कंपन्यांना देत होते.  

मुलुंडमध्ये राहायला, चेंबूरमध्ये कार्यालय

मुलुंडमध्ये राहणाऱ्या या दोघांचे कार्यालय चेंबूरमध्ये होते. पोलिसांनी या दोघांना पकडण्यासाठी सापळा रचला. या दोन्ही भावांनी या संकेतस्थळाचे युजर आयडी आणि पासवर्ड विकत घेण्यासाठी बोगस ग्राहक तयार केले. एका बँक रिकव्हरी एजंटच्या माध्यमातून त्यांच्याकडून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवले. त्यावर लॉगिन करताच पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी मोबाईल क्रमांक टाकले असता अवघ्या एका क्लिकवर या आधारकार्डला लिंक असणारी सर्व माहिती तसेच त्या व्यक्तीचे नाव, पत्ता, गावाचा पत्ता, आधारकार्ड  क्रमांक, पॅनकार्ड इत्यादी माहिती आणि सद्यस्थितीत वापरत असलेला मोबाईल क्रमांक आणि कुटुंबाची अचूक माहिती उपलब्ध झाली.

वैयक्तिक आणि खाजगी माहिती कुठेही दिलेली नसताना बेकायदेशीररित्या डेटाची विक्री 

वैयक्तिक आणि खाजगी माहिती कुठेही दिलेली नसताना या संकेतस्थळावर विशिष्ट ऍडमिन युजर आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून ही माहिती बेकायदेशीररित्या विकली जात असल्याचे समोर आले. प्रकरणी गुन्हे शाखेने चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना  केली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असून या टोळीने अनेक खाजगी कंपन्या तसेच बँक रिकव्हरी एजंट यांनाही भारतीयांची माहिती विकल्याची शक्यता आहे. याचा तपास आता गुन्हे प्रकटीकरण कक्ष करत आहे. 

ही बातमी देखील वाचा

Data Protection Bill : डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन विधेयकाचा मसुदा जारी, 500 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवणार?, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष, मागच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवणार?, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष, मागच्या सुनावणीत काय घडलं?
Mumbai Monsoon Diseases : मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
Embed widget