Mumbai Crime News: संतापजनक! ट्यूशन टिचरने ओलांडल्या क्रूरतेच्या मर्यादा,14 वर्षीय विद्यार्थ्याचे दोन्ही हात चादरीने बांधून केले अत्याचार
Mumbai Crime News: या घटनेनंतर विद्यार्थी मानसिक तणावाखाली गेला होता. कुटुंबातील सदस्यांनी मुलाला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याने त्याबाबतची माहिती दिली आहे.
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खासगी ठिकाणी शिकवणीसाठी जाणाऱ्या एका विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार (Mumbai Crime News) केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना धारावी परिसरात घडली आहे. 14 वर्षीय विद्यार्थ्याने मोबाइलमध्ये पाॅर्न व्हिडिओ दाखवत, त्याचे दोन्ही हात चादरीने बांधून त्याच्यावरती अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. (Mumbai Crime News)
धारावी पोलिसांनी खासगी शिकवणी शिक्षक मायतरी अशान्ना (वय 34) याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. आरोपी शिक्षकाचे धारावी 90 फिट रोड येथे माय ट्युटोरियल नावाचे खासगी क्लासेस आहेत. 21 जुलै रोजी 14 वर्षीय विद्यार्थ्यासोबत हा प्रकार (Mumbai Crime News) घडला होता. मात्र बदनामीच्या भितीने त्याने याबाबत कुठेही काहीही सांगितलं नाही.
या घटनेनंतर विद्यार्थी मानसिक तणावाखाली गेला होता. कुटुंबातील सदस्यांनी मुलाला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याने त्याबाबतची माहिती दिली आहे. या प्रकरणी धारावी पोलिस (Mumbai Crime News) अधिक तपास करत आहेत.
धारावीतील या धक्कादायक घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या 14 वर्षाच्या मुलाला त्याच्या शिकवणीच्या शिक्षकाने मोबाइलमध्ये पाॅर्न व्हिडिओ दाखवत अनैसर्गिक अत्याचार (Mumbai Crime News) केला. त्यानंतर तो विद्यार्थी मानसिक तणावाखाली गेला होता. घरातील सदस्यांनी त्याला विचारल्यानंतर त्याने या घटनेची माहिती दिली. या प्रकरणी धारावी पोलिस अधिक तपास करत आहेत.