एक्स्प्लोर

CJP Protest : मुलाला आईसह पोलिसांनी ताब्यात घेतलं, मुलाने टाहो फोडला; मुंबईत आंदोलकांवर लाठीचार्ज 

Delhi Jantar Mantar Protest : दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हे आंदोलन केलं जात आहे.

मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला (Jantar Mantar Protest) पाठिंबा देण्यासाठी मुंबईत सुरू केलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं दिसून आलं. दादरच्या परिसरात जमलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ठिकठिकाणी ताब्यात घेतलं. त्याचवेळी या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलेल्या आई आणि मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे पोलिसांच्या दडपशाहीविरोधात विद्यार्थी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. 

दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत कॉकरोच जनता पार्टीच्या (Cockroach Janta Party) वतीने दादरच्या चैत्यभूमी परिसरात आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा मोठा जमाव जमल्याचं चित्र होतं. मात्र, या आंदोलनाला परवानगी नसल्याचं सांगत पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं दिसून आलं. तर काही ठिकाणी विद्यार्थिनी आणि महिलांना ताब्यात घेतलं. 

आईसह मुलाला ताब्यात घेतलं

दरम्यान, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक महिला तिच्या मुलासह दादर परिसरात आली होती. मात्र पोलीस आपल्याला या परिसरात थांबू देत नसल्याचा आरोप तिने केला. आम्हाला चैत्यभूमीवर उभं राहू दिलं जात नाही, पोलीस बाजूला काढतात, असं ती माध्यमांना सांगत होती. त्याचवेळी त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं. त्याचवेळी त्या महिलेसोबत असलेल्या मुलाने टाहो फोडल्याचं दिसून आलं. 

हा मुलगा रडताना तिची आई तिला समजावताना दिसली. तसेच आजूबाजूच्या लोकांनीही त्या मुलाला धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या आई आणि मुलालाही ताब्यात घेतल्याचं दिसून आलं. 

दरम्यान, दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हे आंदोलन केलं जात आहे. 

नवी दिल्लीत आंदोलकांवर लाठीचार्ज

नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आज 'कॉक्रोच जनता पार्टी' आणि आणि विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलं. त्यानंतर या आंदोलकांनी आपला मोर्चा संसदेकडे वळवला. त्यामुळे परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या आंदोलनात हजारो विद्यार्थी, युवक आणि त्यांना पाठिंबा देणारे शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. 

सोनम वांगचुक रुग्णालयात असल्यानं अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात मोर्चा संसदेकडे वळला. मात्र यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी संसद मार्गावरील सुरक्षा बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि गर्दी पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Kishori Pednekar On Kangana Ranaut: घाणेरडी नटी, थू केलं पाहिजे; कुत्री सोडून भो भो करायला लावायचं; किशोरी पेडणेकर कंगना रणौतवर संतापल्या, काय काय म्हणाल्या?
घाणेरडी नटी, थू केलं पाहिजे; कुत्री सोडून भो भो करायला लावायचं; किशोरी पेडणेकर कंगना रणौतवर संतापल्या, काय काय म्हणाल्या?
BMC Mumbai: मुंबई महानगरपालिकेत पैशांची उधळपट्टी, सहा महिन्यांपूर्वीच घेतलेल्या स्कॉर्पिओ कार आवडेनाशा झाल्या, पदाधिकाऱ्यांनी मागितल्या नव्या इनोव्हा कार
मुंबई महानगरपालिकेत पैशांची उधळपट्टी, सहा महिन्यांपूर्वीच घेतलेल्या स्कॉर्पिओ कार आवडेनाशा झाल्या, पदाधिकाऱ्यांनी मागितल्या नव्या इनोव्हा कार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
Embed widget