मुंबईतील रूग्ण दुपटीच्या कालावधीत घसरण; 300 च्या घरात असलेला कालावधी आता 196 दिवसांवर
मुंबईकरांसाठी अत्यंत चिंतेची बाब म्हणजे, मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी म्हणजेच डबलिंग रेट घसरला आहे. आधी 300 च्या घरात असलेला कालावधी आता 196 दिवसांपर्यंत खाली आला आहे.
मुंबई : दिवाळीनंतर कोरोनाबाबतची चिंता वाढवणारी बातमी आता समोर येत आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी म्हणजेच डबलिंग रेट घसरला आहे. आधी त्रिशतक गाठलेला रुग्ण दुपटीचा कालावधी 196 दिवसांपर्यंत कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 196 दिवसांपर्यंत खाली आला आहे. गेल्या दहा दिवसांत हा कालावधी 100 दिवसांनी कमी झाला आहे. काल शनिवारी मुंबईत 1 हजार 63 रुग्णांची नोंद झाली, तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 196 दिवसांपर्यंत खाली आला आहे. गेल्या दहा दिवसांत हा कालावधी 100 दिवसांनी कमी झाला आहे. दरम्यान, शनिवारी मुंबईत 1 हजार 63 रुग्णांची नोंद झाली, तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर मुंबईतील कोरोनाचा संसर्ग वाढल्याचं दिसून येत आहे.
पाहा व्हिडीओ : चिंताजनक! मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 104 दिवसांनी कमी
मुंबईतील एकूण कोरोना बधितांची संख्या 2 लाख 81 हजारांच्या पुढे गेली आहे. शनिवारी 880 रुग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत 2 लाख 55 हजारांहून अधिक म्हणजेच, 91 टक्के रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या 12 हजार 753 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाबळींची संख्या 10 हजार 773 वर गेली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर 0.35 टक्के झाल्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी कमी झाला आहे. दिवाळीपूर्वी 320 दिवसांवर असलेला कालावधी आता 196 दिवसापर्यंत खाली आला आहे. दहा दिवसांपूर्वी हा कालावधी 297 दिवसांपर्यंत होता.
मुंबईतील वाढणाऱ्या कोरोना संसर्गावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रीया देतांना सांगितलंय की, 'दिवाळीत बाजारातील गर्दी वाढली होती, सर्व अनलॉक झालं आहे. मंदिरं खुली करण्यात आली आहेत. यामुळे आकड्यात बदल होईल हे माहीत होतं. मुंबईचा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 300 वर गेला होता तो कमी झाला आहे, ही चिंतेची बाब आहे. मुंबईकरांनी अजूनही काळजी घेतली पाहिजे, जे नियम आहेत ते पाळले पाहिजेत.' यापुढे भाजप आणि मनसेवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या की, 'काही राजकीय पक्षांना उत आलाय, गर्दी जमवून आंदोलन करत आहेत, हे थोडं टाळलं पाहिजे, लोकांचा जीव धोक्यात टाकू नका. मुंबईकरांनी गर्दी टाळली पाहिजे, कारण संकट टळलेलं नाही.'