Mumbai Corona Update : मुंबईत गेल्या 24 तासात 485 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; तर 432 रुग्ण कोरोनामुक्त
मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4739 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1276 दिवसांवर गेला आहे.
मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. कोरोनाची ही वाढलेली आकडेवारी चिंतेचा विषय बनत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 485 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,14,424 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 41 हजार 024 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली
मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4739 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1276 दिवसांवर गेला आहे. सील केलेल्या इमारतींची संख्या देखील वाढली आहे. मुंबईतील सध्या 42 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन शुन्य आहेत.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 18, 2021
१८ सप्टेंबर, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/dizByhpVne
राज्यात आज 3, 391 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात आज 3, 391 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 841 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 28 हजार 561 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.09 टक्के आहे. राज्यात आज 80 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12, 699 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सध्या 47 हजार 919 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,68,74,491 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,18,502 (11.46 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,83,445 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,812 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
देशात गेल्या 24 तासांत 30,570 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. देशात चार दिवसांनी पुन्हा एकदा दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याचं दिसून आल. गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 30,570 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 431 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 38,303 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.