(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Corona Update : मुंबईत आज 44 नव्या रुग्णांची नोंद तर एका रुग्णाचा मृत्यू
Mumbai Corona Update : मुंबईमध्ये बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तर कोरोना वाढीचा दर 0.005 टक्के इतका आहे.
मुंबई: शहरातील कोरोनाची आकडेवारी आता पन्नाशीच्या आत आली आहे. आज मुंबईत 44 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 48 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 341 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईमध्ये आतापर्यंत 10,38,764 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी हा 14,960 इतका झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.005 टक्के इतका आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 15, 2022
१५ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्णौ- ४४
२४ तासात बरे झालेले रुग्ण-४८
बरे झालेले एकूण - १०३८७६४
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९८%
एकूण सक्रिय रुग्ण-३४१
दुप्पटीचा दर-१४९६० दिवस
कोविड वाढीचा दर (८ एप्रिल-१४ एप्रिल )-०.००५%#NaToCorona
राज्यातील स्थिती
शुक्रवारी राज्यात 69 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 681 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 132 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,27, 112 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 98, 25, 249 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या: