Mumbai Corona Update : मुंबईत बुधवारी 1648 रुग्णांची नोंद, 2291 कोरोनामुक्त
Mumbai Corona Update : बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी मुंबईत 1648 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 1648 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत बुधवारी 2291 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 66 हजार 294 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 588 झाली आहे. सध्या मुंबईत 13 हजार 501 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 1648 रुग्णांमध्ये 1557 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 371 दिवसांवर गेला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 22, 2022
22nd June, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 1648
Discharged Pts. (24 hrs) - 2291
Total Recovered Pts. - 10,66,294
Overall Recovery Rate - 97%
Total Active Pts. - 13501
Doubling Rate - 371 Days
Growth Rate (15th June- 21st June)- 0.183%#NaToCorona
सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 13501 सक्रिय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 5621 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात 2310 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 822, रायगड 1087, रत्नागिरी 52, सिंधुदुर्ग 61, सातारा 38, सांगली 15, कोल्हापूर 34, सोलापूर 35, नाशिक 204, अहमदनगर 71, जळगाव 24, औरंगाबाद 63, लातूर 49, परभणी 14, हिंगोली 12, नांदेड 11, उस्मानाबाद 20, अमरावती 20, अकोला 20, वाशिम 42, बुलढाणा 27, यवतमाळ 13, नागपूर 306, वर्धा 23, भंडारा 34, गोंदिया 13, गडचिरोली 27 आणि चंद्रपूरमध्ये 47 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 24639 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात बुधवारी दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायाला मिळाली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी राज्यात चारशे रुग्ण कमी आढळले आहेत. मंगळवारी राज्यात 3659 कोरोना रुग्ण आढळले आहेत. बुधवारी ही संख्या 3260 वर आली आहे.
संबंधित बातम्या