एक्स्प्लोर
Advertisement
इंदू मिलवरील बाबासाहेबांच्या स्मारकासाठी विरोधक आक्रमक
मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढल्यानंतर आता विरोधकांनी आपला मोर्चा मुंबईतील इंदू मिलवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या प्रश्नाकडे वळवला आहे. विधीमंडळाचं अधिवेशन संपायला एकच दिवस शिल्लक असताना विरोधक इंदू मिलवरील स्मारकाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत.
लवकरात लवकर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांचं काम सुरु व्हावं, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते इंदू मिलजवळ एकत्र आले आणि सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली. "तीन वर्षात स्मारकाचं काही काम न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो." "माफी मागा, माफी मागा, महाराष्ट्राची माफी मागा," अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या.
आंबडेकर जयंतीही जवळ आली आहे. तरीही बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. राज्य सरकार स्मारकाच्या कामाबाबत वेळकाढूपणा करतंय, दुर्लक्ष करतंय. सरकारला गांभीर्यच नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement