एक्स्प्लोर
कसारा स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरले, मध्य रेल्वेवर खोळंबा

कल्याण : कसारा रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने इगतपुरीच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात घडल्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मालगाडीचे घसरलेले डबे रुळावरुन हटवण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. मध्य रेल्वेची वाहतूक कसाऱ्यापर्यंत न ठेवता आसनगावपर्यंतच सुरु ठेवण्यात आली आहे. यामुळे मुंबईहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस आणि लोकल ट्रेन्सचा खोळंबा झाला आहे. वाहतुकीवर परीणाम झालेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या राज्यराणी एक्स्प्रेस विदर्भ एक्स्प्रेस दुरान्तो एक्स्प्रेस पंजाब मेल अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण























